तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Friday, 15 September 2017

सामाजीक क्षेत्रातील बहुआयामी व्यक्तीमत्व डाॅ पंडीत निवर्तले


मंगरुळपीरःयेथील राजकीय नेते व समाजसेवक साहीत्यीक डाॅ विकल पंडीत यांचे दि 15 रोजी सकाळी चार वाजताच्या सुमारास ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले मृत्युसमयी त्याचे वय 66 होते                                        1984 ते 1992 पर्यत ते नगरसेवक व आरोग्य सभापती होते तसेच डाॅ बाबासाहेब आंबेडकर समीती स्मारक उभारले त्यावेळी नगरपालीकेत स्वबळावर सत्ता स्थापन करुन समतावादाचे राजकारण केलै ऐवढेच नव्हे तर त्यांनी विवीध समाजोपयोगी उपक्रम राबविले यामध्ये विशेषता चिकुन गुणीया आजार तालुक्यात पसरला त्यानी या चिकुनगुणीया रुग्नावर उपचार करुन त्यांना आजार मुक्त केले व कुष्ठरोग निर्मुलनासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले तसैच त्यांनी लिहलैली भावगीते व सास्कृतिक क्षेञात अजुनही रसिकांच्या ओठावर आहेत याशिवाय सत्यघटनेवर आधारित "नागीली"नाटक सेंसार बोर्डाने नुकतेच संमत केले असुन त्यांनी शेवटच्या क्षणापर्यत ऊपयोगी पडावे या ऊदात्त हेतुने देहदानाचा संकल्प केला होता.येथिल डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात पार्थीव अंत्यदर्शनासाठी ठेवन्यात आले होते.यावेळी सामाजीक क्षेञातील,तथा राजकिय,साहित्यिक,विविध सामाजिक संघटना आदि मान्यवरांनी भेट देवून आदरांजली वाहिली.त्यांचे पश्चात पत्नी,तिन मुले एक भाऊ व एक बहीण आहे.

*प्रतिक्रीया*- समाजभुषण डाॅ.विकलपंडित यांच्या निधनाने फुले शाहु आंबेडकरी विचाराचा वटवृक्ष कोसळला
-सामाजिक कार्यकर्ता-सुभाष हातोलकर

सामाजिक,राजकिय व सांस्कृतिक कार्यात सर्देव अग्रेसर असणारा महाकाय वटवृक्ष ऊमळला असुन तालुक्यातील आंबेडकरी जनता पोरकी झाली.
-सामाजिक कार्यकर्ता,फुलचंद भगत

समता व बंधुत्वतेचा प्रचार आणी प्रसार करणारा शांतीदुत हरवला.
-प्रा.अरूणकुमार इंगळे
माजी सदस्य,शिक्षण मंडळ

डाॅ.विकलपंडित यांच्या निधनाने धर्मनिरपेक्षतेचे राजकारण करणारा लढवय्या नेता हरवला,
-सामाजिक कार्यकर्ता-शफायतभाई

मागासवर्गीय चळवळीचा समतादुत हरविल्याने सामाजिक क्षेञात पोकळी निर्माण झाली.
-पञकार,सुनिल भगत

साहित्य व रंगभुमि व सामाजिक क्षेञातील एक दिग्दर्शक हरविला आहे.
-प्रा.ज्ञानदेव बन्सोड

No comments:

Post a Comment