Breaking News
Loading...

Thursday, 7 September 2017

संघर्ष सभेस सर्व कार्यकर्ते जाणार - जावेद शेख


प्रा. डॉ.संतोष रणखांब
तेजन्युज हेडलाईन्स प्रतिनिधी
सोनपेठ :  काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांचे उद्या दि. 8 सप्टेंबर  2017 रोजी,नुतन मैदान परभणी येथे दौऱ्यानिमित्त आगमन होणार आहे. या सभेसाठी सर्व कार्यकर्ते सोनपेठ तालुक्यातून जाणार असल्याचे कॉग्रेंस मिडिया सेलचे अध्यक्ष जावेद शेख यांनी सांगितले.
या संदर्भात काढलेल्या पत्रकात जावेद शेख यांनी सोनपेठ तालुक्यातील व शहरातील  काँग्रेस कार्यकर्ते व नागरीक मोठ्या संख्येने "संघर्ष सभेस" उपस्थित रहाणार आहेत असे कळवले आहे.   शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी कॉग्रेंस ची ही सभा असून या संघर्ष सभेबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यातून अनेक कार्यकर्ते या सभेसाठी जाणार आहेत असेही शेख यांनी कळवले आहे.

No comments:

Post a Comment