तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Sunday, 17 September 2017

भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांच्यावर पुण्यात गुन्हा.


_________________________

प्रसिद्ध उद्योजक आणि भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील न्यू कोपरे गावाच्या पुनर्वसनासाठी सरकारकडून देण्यात आलेली सतरा एकर जमीन बेकायदा बळकावल्याचा आरोप काकडेंवर आहे. संजय काकडेंसह सूर्यकांत काकडे, अशोक यादव आणि एकावर कलम 420, 406, 465, 467, 468 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शनिवारी रात्री उशिरा पुण्यातील वारजे पोलिस स्टेशन मधे गुन्हा नोंदवण्यात आला. पुण्यातील न्यू कोपरे गावाच्या पुनर्वसनासाठी सरकारकडून सतरा एकर जमीन देण्यात आली होती. ही जमीन अवैधरित्या बळकावल्याच्या आरोप काकडेंसह चौघांवर आहे. न्यू कोपरे गावचे ग्रामस्थ दिलीप मोरे यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. खासदार संजय काकडे यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. आपला संपूर्ण व्यवहार स्वच्छ असून आपल्या बदनामीसाठी जाणीव पूर्वक प्रयत्न सुरु असल्याचा दावा काकडेंनी केला आहे.आपण पोलिसांना या प्रकरणात तपासासाठी सर्व ते सहकार्य करु असं खासदार संजय काकडे यांनी म्हटलं आहे. खटल्याचा निकाल आपल्या बाजूने लागेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. जुलै महिन्यात पुणे सत्र न्यायालयाने संजय काकडे यांचे भाऊ सूर्यकांत काकडे यांना दणका दिला होता. बळकावलेला 9 एकराचा भूखंड पालिकेच्या ताब्यात परत देण्याचा आदेश पुणे सत्र न्यायालयाने दिला होता.

No comments:

Post a Comment