तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Tuesday, 12 September 2017

संताची शिकवण माणसाला सकारात्मक उर्जा देते -: जिवराज डापकर


प्रा. डॉ. संतोष रणखांब
तेजन्युज हेडलाईन्स प्रतिनिधी
सोनपेठ :
तालुक्यातील नरवाडी येथील नगरेश्वर मंदिरातील "पंचपदी"भजनासाठी आवर्जून उपस्थित असलेले तहसिलदार जिवराज डापकर यांनी संताची शिकवण सकारात्मक उर्जा मिळत आसल्याचे प्रतिपादन केले.
नरवाडी येथील नगरेश्वर मंदिरात परंपरेनुसार होत आसलेल्या व पंचक्रोशीत प्रसिध्द आसलेल्या "पंचपदी "भजनाला सोनपेठ चे तहसिलदार जिवराज डापकर यांनी सदिच्छा भेट दिल्यानंतर येथील भजनी मंडळीसोबत हितगुज करत येथे उपस्थित आसलेल्या नागरिकांशी संवाद साधला. त्यावेळी डापकर बोलत होते,
सांप्रदायिक शिकवणीतील माणसे ही आपण समाजाचे देणे लागतो या भावनेने वागतात त्यामुळे त्यांचे सौजन्य समाजाला प्रेरणादायी ठरत आसुन संताची शिकवण ही माणसाला सकारात्मक उर्जा देत आसते आणि म्हणुनच मी अशा कार्यक्रमात सहभागी होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
नरवाडी येथील नगरेश्वर मंदिरात दर सोमवारी पंचपदी भजन मोठ्या उत्साहात येथील ग्रामस्थ करत असतात तर आमावश्या झाल्यानंतरच्या सोमवारी नगरेश्वराची पालखी मिरवणुक मंदिर परिसरात ग्रामस्थ काढत आसतात.
यावेळे तहसीलदार जिवराज डापकर यांच्यासह प्रा.डॉ.संतोष रणखांब व सुभाष सुरवसे हे सुध्दा उपस्थित होते.
यावेळी पंचपदी भजनाला शिवाजी पांडुळे,
,श्रीधर जोगदंड, बालासाहेब पांडुळे, रामेश्वर मस्के,माधुआप्पा गांगर्डे, लक्ष्मण मस्के, भिमा गुरव,कुंभकर्ण गांगर्डे, मदन पांडुळे, तुकाराम जोगदंड, तुकाराम डिंगने, ज्ञानेश्वर चोपदार,रामकिशन धुमाळ,भागवत आंकुशे,आशोक गांगर्डे, सुनिल नरवाडकर, मारोती तोंडगे,प्रभतराव गांगर्डे, विश्वनाथ हेंडगे, शाम नरवाडकर,आश्रुबा वायंगडे, दगडु जोगदंड,गंगाधर झगडे
यांच्यासह महिला वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी तहसिलदार जिवराज डापकर यांचा ग्रामस्थ व राजे शिवाजी मंडळाकडुन सत्कार करण्यात आला.

No comments:

Post a Comment