Breaking News
Loading...

Friday, 8 September 2017

गेवराई तालुक्याचा 'बजरंग ग्रुप' एकजुटीने 'तिरुपतीला' रवाना

विशेष प्रतिनिधी....
-------------------
गेवराई, दि. 8 __ सामाजिक कार्याचा वसा घेऊन अविरतपणे तत्पर राहणाऱ्या येथील 'बजरंग' ग्रुप' शुक्रवार, दि. 8 सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता 'तिरुपती' दर्शनासाठी रवाना झाला असल्याची माहिती ग्रुपचे अध्यक्ष सुभाष मुळे यांनी दिली आहे.
         नाशिक जिल्हा व तदनंतर मांगीतुंगी आणि आता बालाजीच्या तिरुपतीसाठी एकूण पैकी 33 सदस्य असलेला जीवाभावाचा हा ग्रुप दर्शनासाठी रवाना झाला आहे. गेवराई येथील पत्रकार तथा ग्रुपचे अध्यक्ष सुभाष मुळे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जालिंदर आण्णा पिसाळ, गेवराई येथील पंचायत समितीचे माजी उपसभापती डॉ. दिलीपराव शिंदे, डाॅ. नंदकिशोर लोया, सुदेशजी पोतदार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सहाय्यक सचिव वैजनाथराव चौधरी जिजा, अॅड. दुर्गेशजी माने, सुधाकरराव ससाणे सर, राजेंद्रजी गिरे, सखारामजी कानगुडे यांच्या अथक नियोजनाखाली हा तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी पहिल्यांदाच एकत्रित जात आहे. शुक्रवार, दि. 8 सप्टेंबर रोजी 33 सदस्य असलेला जीवाभावाचा हा ग्रुप रवाना झाला असून बुधवार, दि. 13 रोजी दुपारी परतणार आहे. या दौऱ्यात डॉ. नंदकिशोरजी लोया, सुनीलराव मडकर, राधेश्यामजी खंडेलवाल, प्रकाशराव शेटे, रामेश्वरजी कापसे, गोपालसेठ जाकोटिया, श्रेणिकजी मडकर, वैजनाथराव हक्कदार, जालिंदर आण्णा पिसाळ, शहादेवराव सुतार सर, सुधाकरराव ससाणे सर, शिवप्रसादजी मालानी, अविनाश कुलकर्णी, राजेंद्रजी सोनी, रामेश्वरजी भुतडा, रामराव पवार सर, गोरक्षनाथ येवले, वैजनाथ जिजा चौधरी, रमेश भाऊ वाघमारे, विष्णूपंत पवार साहेब, आत्मारामजी मोटे, शिवाजीराव खिंडकर, अॅड. दुर्गेशजी माने, राजेंद्रजी गिरे, संजयजी गायकवाड, सखारामजी कानगुडे, डॉ. दिलिपरावजी शिंदे, राजेंद्रजी पवार, कैलासराव शिंदे, आबासाहेब उबाळे, सुदेशजी पोतदार, बालाप्रसादजी सोनी व सुभाष मुळे आदिंचा समावेश असणार आहे.
         बजरंग ग्रुपच्या गेवराईच्या वतीने तिरुपतीस जाण्यासाठी विविध समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. यामध्ये रेल्वे / दर्शन समितीवर सुदेशजी पोतदार, अॅड. दुर्गेशजी माने, वाहन नियोजन समितीवर राजेंद्रजी गिरे, रमेश भाऊ वाघमारे, भोजन, चहा, नाश्ता समितीवर शिवप्रसादजी मालानी, सुनीलराव मडकर, प्रकाशराव शेटे, निधी संकलन समितीवर सुधाकरराव ससाणे सर, अविनाश कुलकर्णी सर, निवासस्थान कक्ष समितीवर सखारामजी कानगुडे, डॉ. नंदकिशोरजी लोया आदिंचा समावेश आहे. एवढा मोठा हा ग्रुप एकोप्याने, एक विचार घेऊन जात असल्याने गेवराई पंचायत समितीचे माजी उपसभापती डॉ. दिलिपराव शिंदे, भगवानराव पाबळे, दिलीपसेठ गंगवाल, गोपालसेठ जाकिटे, सुभाषसेठ मुंदडा, सुनिलराव मुळे, गणेश कापसे, रामभाऊ सुरवसे, हिरालालजी मडकर, विजयकुमार जैन, भाऊसाहेब मोटे, अनिलराव तौर, गणेश मोटे, संभाजी मोटे, जगदिश मोनानी, सुरेश कापसे, विक्रमराव देशपांडे, संजय देशपांडे, अमित पंडित आदिंसह अनेकांनी सदिच्छा व शुभेच्छा दिल्या आहेत.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी : गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

No comments:

Post a Comment