तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Thursday, 14 September 2017

अज्ञात इसमाने पळविले दोन लाख रुपये चोरट्याचा पाठलाग निष्फळ : जनतेत घबराट गुन्हा दाखल झाला नसल्याने घटनेतील गुढ वाढले


सेलू/प्रतिनिधी

मोटारसायकलची चोरी, महिलेच्या गळ्यातील दागिने, घरफोडी आणि दुकान फोड्याबरोबरच एका इसमाची रोख रक्कम पळविल्याच्या घटनेने सक्रीय चोरट्यापुढे पोलिस भांबावून गेले आहेत. तर नागरीक मात्र भयभीत झाले आहेत. बुधवार दि. 13 सप्टे. रोजी रात्री 8.00 च्या सुमारास एका ईसमाचे त्याच्या बँगमध्ये असेललेले 2 लाख 30 हजार रुपये एका अज्ञात इसमाने पळवून नेल्यामुळे एकच खळबळ उडाली. विद्यानगर परिसरात बंद असलेल्या पोलिस चौकी परीसरात हा प्रकार घडला. विद्यानगर- इदगाह मैदान रस्त्यावर कायम अंधार असतो याचा फायदा घेत पाठलाग करत असलेल्या अज्ञात चोरट्याने त्या इसमास गाठले आणि क्षणार्धात त्याच्या हातात असलेली दोन लाख तीस हजार रुपयांची बॅग घेऊन पलायन केले. घडल्या प्रकाराने घाबरलेल्या इसमाने आरडाओरड केली. काही वेळाने पोलिस आले त्या इसमाने घटनास्थळ दाखविले आणि घडल्याप्रकाराचे माहिती दिली. ही घटना घडल्यानंतर पोलिस निरीक्षक दादाहरी चौरे यांनी आपल्या सहकारी पोलिसांना घेऊन पाहणी केली. आंध्रा बँकेसमोर अज्ञात चोरट्याचा सीसीटीव्ही मध्ये माग निघतो  का असे पाहण्यात आले. असल्याचे घटनास्थळावर लोक बोलत होते. या इसमाला घेऊन पोलिस सुमारे दोन तास अज्ञात चोरट्याच्या शोधात होते. त्याचा मात्र काहीच तपास लागला नाही आणि या प्रकाराचा गुन्हाही दाखल झाला नाही. शहरभर एका इसमाने दोन लाख तीस हजार रुपये अज्ञात चोरट्याने पळविली ही वार्ता पसरवली. पोलिसांनी शोध घेतल्याने यात सत्यताही वाटली पण गुन्हा मात्र दाखल झाला नसल्याने घडला प्रकार नेमका काय होता हे मात्र गुढच राहीले. यामुळे पोलिसांची धावपळ देखील निरर्थकच ठरली.

No comments:

Post a Comment