तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Thursday, 14 September 2017

गेवराई : आता बालकांसह युवकांनाही जडलयं "लुडो गेमचे" व्यसन

सुभाष मुळे...
-----------------
गेवराई, दि. 14 ___ आजच्या धावपळीच्या युगात मैदानी खेळ लुप्त पावत असतांना त्यातच करमणुकीचे साधन म्हणुन वापरले जाणारे स्मार्ट फोन मधील "लुडो किंग" हे अॅप युवापिढीसाठी घातक ठरू लागले आहे.
       सुशिक्षित बेरोजगार, नौकरदारासह, अबालवृध्द, विद्यार्थीही पैशावर हा खेळ खेळतांना गेवराई शहरासह ग्रामिण भागात सर्रासपणे पहावयास मिळत आहे. यामुळे अनेकांचे आर्थिक नुकसान होत आहे. आयपीएल, आॅनलाईन तीन पत्ती, मटका, पाठोपाठ या गेमचे प्रस्थ वाढु लागल्याने चिंता व्यक्त होत आहे. हा मोबाईल गेम तरूण पिढीसाठी घातक ठरत असुन तो आता पैशावर खेळवला जात आहे. जिंकण्याच्या स्पर्धेमुळे युवापिढीचे नुकसान होत आहे. आजच्या घडीला प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे परंतु त्याचा उपयोग चांगल्या कामासाठी होण्या ऐवजी दुरपयोग जास्तचा होतांना दिसत आहे. स्मार्टफोन मधील करमणुकीचे खेळ आता पैशावर खेळले जात आहे. त्यात हल्ली सर्वांच्या परिचयाचा असलेला "लुडो किंग" हा गेम स्मार्टफोन असणाऱ्या युवा पिढीच्या सर्वांकडे जवळपास हा गेम आहे. लुडो हा खेळ एकाच मोबाईलवर खेळण्यासाठी दोन ते चार लोकांची आवश्यकता असते. यासाठीबेरोजगार युवक आपल्या सहकार्यांसोबत मिळेल त्या ठिकाणी शाळा, काॅलेज, हाॅटेल, गल्ली बोळ्यात, बस स्थानक, सार्वजनिक ठिकाणी, शासकिय कार्यालय, जुनी नगर परिषद कार्यालय चबुतरा, दत्तात्रय मंदिर जवळील बाजार तळ अशा ठिकाणासह लुडो गेमने गेवराई शहर व ग्रामीण भागात धुमाकुळ घातला आहे. तरूणासह लहान मुले अबालवृध्द व सुशिक्षित युवक लुडो गेमच्या मोहात अडकले आहेत. तरूण मुले आपला काम धंदा सोडुन दिवसातील पाच ते सहा तास लुडो खेळण्यासाठी घालवतांना दिसत आहे. राञी उशिरा पर्यंत कशाचीही तमा न बाळगता पैशावर या गेमच्या मोहात सुशिक्षितांबरोबर अशिक्षित युवकही पडले आहेत.
      लुडो खेळणारे केवळ करमणुक म्हणुन याकडे पाहतांना दिसत नाहीत तर हा गेम ते पैशावर खेळला जात आहे. हा एक प्रकारचा जुगारच असुन या प्रकरणी प्रशासनाने लक्ष देऊन लुडो खेळणाऱ्यावर कडक कार्यवाही करावी अन्यथा युवापिढी यातुन बरबाद होईल की काय अशी परिस्थिती सध्या दिसत आहे.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

No comments:

Post a Comment