तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Friday, 8 September 2017

शेतकऱ्याची आत्महत्या


जिंतूर तालुक्यातील घटना

जिंतुर तालुक्यातील मानकेश्वर  येथील ५२ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याने शेतात सततची नापिकी व कर्जाची परतफेड या आर्थिक तसेच मानसिक विवंचनेत सापडून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवार ७ सप्टेंबर रोजी रात्री 8:30 वाजनेच्या सुमारास उघडकीस आली असून मागील पंधरवड्यात गावातील दुसरी घटना आहे
सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
                   जिंतूर तालुका हा आधीच डोंगराळ भागात असून कोठेही उद्योग व्यवसाय नाहीत त्यातच मागील तीन वर्षांपासून निसर्गाची अवकृपा झाली असून सध्या तालुक्यात पावसाने मध्ये दडी मारली असल्याने हाताशी आलेले पीक जाण्याचा मार्गावर आहेत यामुळे बँकेचे कर्ज कसे फेडावे या नैराश्यतुन काल ७ सप्टेंबर रोजी रात्री 8 :30 वाजेच्या सुमारास मानकेश्वर येथील 52 वर्षीय वृद्ध शेतकरी सुभाष काकडे यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेउन आत्महत्या केली त्यांचाकडे महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे साठ हजार रुपये कर्ज असल्याचे समजते यामुळे सततची नापीकी व या वर्षी पावसाने दगा दिल्या मुळे सदरील बँंकेचे कर्ज कसे फेडायचे असा प्रश्न त्यांना पडला होता म्हणून याच विवनचनेतून  त्यांनी आपल्या रहात्या घरामध्येच गळफास घेवुन आपली जिवन यात्रा संपवली आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले आहेत दरम्यान मागील आठवड्यात याच गावात  काशिनाथ शेळके यांनी  शेतातच गळफास घेउन आत्महत्या केली होती या पंधरा दिवसातील ही दुसरी घटना असल्याने गावात शोककळा पसरली आहे.

No comments:

Post a Comment