तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Monday, 11 September 2017

मनपाची करवाढ कदापीही सहन करणार नाही-आ.राहुल पाटील

परभणी: प्रतिनिधी
परभणी शहर महानगर पालिकेने कोणत्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध करुन न देता मनपा प्रशासनाने शहरातील घरपट्टी व इतर मालमत्ता करात अचानक अवाजवी व अन्यायकारक करवाढ करुन नोटीसा बजवाल्या. मनपाची करवाढ कदापीही सहन करणार नाही असा खा. संजय जाधव आणि  जनतेचे खिसे कापू नका असा इशारा आ. राहुल पाटील यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी निषेध मोर्चाला मार्गदर्शन करतांना दिला.
करवाढीच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने मोर्चा शनिवार बाजार येथुन शहरातील शिवाजी चौक, गुजरी बाजार, गांधीपार्क मार्गे शिवाजी पुतळा, जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या निषेध मोर्चाचे रुपांतर जाहीर सभेत करण्यात आले. महानगर पालिकेने केलेल्या जाचक करवाढीचा या वेळी तिव्र शब्दात निषेध करण्यात आला. या वेळी व्यासपीठावर शिवसेना महिला संपर्कप्रमुख शिल्पा सरपोतदार, खा.संजय जाधव, आ.डॉ.राहुल पाटील, सहसंपर्कप्रमुख डॉ.विवेक नावंदर, जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आनेराव, डी.एन.दाभाडे,सूर्यकांत हाके , उपजिल्हाप्रमुख संजय गाडगे, सदाशिव देशमुख, विधानसभा प्रमुख माणिक पोंढे, तालुकाप्रमुख नंदकुमार आवचार, शहरप्रमुख ज्ञानेश्वर पवार, युवासेना जिल्हाधिकारी अर्जून सामाले, युवासेना तालुकाप्रमुख संदीप झाडे, युवासेना शहरप्रमुख बाळराजे तळेकर, विशू डहाळे, मनपा गटनेते चंदू डहाळे, तसेच शिवसेनेचे सर्व मनपा सदस्य, जि.प. सदस्य, बाजार समिती सदस्य, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, महिला आघाडी, दलित आघाडी, शिक्षकसेना, शिवसैनिक व युवासैनिक उपस्थित होते. या वेळी माजी विरोधीपक्षनेत्या अंबिका डहाळे, माजी आ. मिरा रेंगे, विजय वाकोडे, डी.एन. दाभाडे, जिल्हा प्रमुख आनेराव, डॉ. संजय कच्छवे यांनी मनमानी करवाढीचा पाढा वाचत हा कर रद्द करावा अशी मागणी केली. तसेच व्यापारी महासंघाच्या वतीने सचिन  अंबिलवादे यांनी गाळेधारकांना केलेली भाडेवाढ आणि घरपट्टी या बाबत मनपाच्या कारभारावर टिकास्त्र सोडले. या निषेध मोर्चात मनपा आयुक्त राहुल रेखावार यांच्या मनमानी कारभारामुळे परभणीतील जनतेला वेठीस धरले जात असल्याचा आरोप करण्यात आला. या वेळी मार्गदर्शन करतांना आ. राहुल पाटील यांनी वाढीव करवाढ ही रद्द केलीच पाहिजे या ाा्रश्ना संदर्भात आपण विधानसभेत आवाज उठवू असे आश्वासन दिले. मनपाचा कारभार हा राक्षसी प्रवृत्तीने प्रेरीत असून कोणत्याही प्रकारची विकास कामे केली जात नाहीत. तसेच महानगर पालिकेत भ्रष्ट कारभाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत जात असल्या बद्दल चिंता व्यक्त केली. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस हे जुळ्या भावाच्या भूमिकेत काम करत असून भाजपानेही साथ दिली आहे.
त्यामुळे आता जनतेच्या प्रश्नासाठी शिवसेनाच रस्त्यावर उचलुन न्याय देईल असे सांगितले. या वेळी खा. संजय जाधव यांनी महानगर पालिकेच्या जाचक करवाढीच्या विरोधात शिवसेना रस्त्यावर उतरली असुन हा लढा म्हणजे लोक चळवळ बनली आहे असे सांगितले. कॉंग्रेस, राष्ट्रवादीने संपुर्ण शहर उदास केले आहे. शहरात एकही रस्ता धड राहिला नाही. जागोजागी खड्डेच खड्डे झाल्याने परभणी शहर येथे महानगर पालिका कार्यरत
आहे की ग्रामपंचायत असा प्रश्न होत असल्याचे सांगितले. परभणीत कोणत्याही प्रकारची औद्योगीक वसाहत नसल्याने तरुणाईच्या हाताला काम नाही.  जर  शिवसेनेच्या हाती परभणीतील नागरिकांनी सत्ता सोपवली असती तर करवाढीची वेळ आली नसती पण निवडणुक काळात केवळ एक दिवसाची सोय पाहण्याच्या नावाखाली केलेली चुक आता भोवत असल्याचे सांगत निवडणुकीतील या करवाढीस नोटा कारणीभुत असल्याचा आरोप या वेळी खा. जाधव यांनी केला.
भावीपिढी पुढे काय आदर्श ठेवणार असा सवाल खा. संजय जाधव यांनी या वेळी उपस्थित केला. आणि मनपाने केलेल्या करवाढ ही कदापीही सहन केली जाणार नाही असे या वेळी बोलुन दाखवले.

No comments:

Post a Comment