तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Thursday, 14 September 2017

वालुर शहरासह ग्रामीण भागातील तरूणांना जडतय "लुडो गेमचे" व्यसन

अनवर पठान
वालुर :-आजच्या धावपळीच्या युगात मैदानी खेळ लुप्त पावत असतांना त्यातच करमणुकीचे साधन म्हणुन वापरले जाणारे स्मार्ट फोन मधील "लुडो किंग" हे अॅप युवापिढीसाठी घातक ठरू लागले आहे.सुशिक्षित बेरोजगार,नौकरदारासह,अबालवृध्­द,विद्यार्थीही पैशावर हा खेळ खेळतांना वालुर शहरासह  ग्रामिण भागात सर्रास पहावयास मिळत आहे.यामुळे अनेकांचे आर्थिक नुकसान होत आहे.आयपीएल,आॅनलाईन तीन पत्ती,मटका,पाठोपाठ या गेमचे प्रस्थ वाढु लागल्याने चिंता व्यक्त होत आहे.हा मोबाईल गेम तरूण पिढीसाठी घातक ठरत असुन तो आता पैशावर खेळवला जात आहे जिंकण्याच्या स्पर्धेमुळे युवापिढीचे नुकसान होत आहे.आजच्या घडीला प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे परंतु त्याचा उपयोग चांगल्या कामासाठी होण्या ऐवजी दुरउपयोग जास्तचा होतांना दिसत आहे.स्मार्टफोन मधील करमणुकीचे खेळ आता पैशावर खेळले जात आहे.त्यात हल्ली सर्वांच्या परिचयाचा असलेला"लुडो किंग" हा गेम स्मार्टफोन असणार्या युवा पिढीच्या सर्वांकडे जवळपास हा गेम आहे.लुडो हा खेळ एकाच मोबाईलवर खेळण्यासाठी दोन ते चार लोकांची आवश्यकता असते.यासाठीबेरोजगार युवक आपल्या सहकार्यांसोबत मिळेल त्या ठिकाणी शाळा,काॅलेज,हाॅटेल,ग­ल्ली बोळ्यात,बस स्थानक,सार्वजनिक ठिकाणी,शासकिय कार्यालय,.लुडो गेमने वालुर शहरासह ग्रामीणभागात धुमाकुळ घातला आहे,तरूणासह लहान मुले अबालवृध्द व सुशिक्षित युवक लुडो गेमच्या मोहात अडकले आहेत.तरूण मुले आपला काम धंदा सोडुन दिवसातील पाच ते सहा तासलुडो खेळण्यासाठी घालवतांना दिसत आहे.राञी उशिरा पर्यंत कशाचीही तमा न बाळगता पैशावर या गेमच्या मोहात सुशिक्षितांबरोबर अशिक्षित युवकही पडले आहेत.लुडो खेळणारे केवळ करमणुक म्हणुन याकडे पाहतांना दिसत नाहीत तर हा गेम ते पैशावर खेळला जात आहे.हा एक प्रकारचा जुगारच असुन या प्रकरणी प्रशासनाने लक्ष देऊन लुडो खेळणार्यावर कडक कार्यवाहि करावी अन्यथा युवापिढी यातुन बरबाद होईल की काय अशी परिस्थिती सध्या दिसत आहे.

तेजन्युज हेडलाईन्स वेब वाहिनी प्रतिनिधी,वालुर
मो.नं.8888375846

No comments:

Post a Comment