तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Thursday, 14 September 2017

सबसे तेज,तेजन्यूज हेडलाईन्स संक्षिप्त

✍🏻 TEJ NEWS HEADLINES ✍🏻

_________________________

गणेशोत्सवा प्रमाणे नवरात्रोत्सव व मोहरमही डॉल्बीमुक्त झाला पाहिजे. त्यासाठी आवश्यक त्या प्रबोधनासह उपाय योजना करा. नावाची नव्हे तर कामाची डी. बी. पथके तयार करा, असे आदेश विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले.


बीड = कर्जाला कंटाळून देवळयात (ता.अंबाजोगाई) शेतकऱ्याची आत्महत्या,पांडुरंग निवृत्ती पवार (वय 65) या शेतकऱ्याने घेतला गळफास


पुणे = मसाप आणि श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी (आळंदी) यांच्या तर्फे पहिले पसायदान विचार साहित्य संमेलनाचे आयोजन.

जीएसटीमुळे इकोनॉमी मध्ये 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ज्यामुळे वस्तूंचे दर कमी होतील - पंतप्रधान मोदी


बीड = चाकूचा धाक दाखवून टाकला लाखोंचा दरोडा. माजलगाव येथील रामराव रांजवण यांच्या घरी घडली घटना.


गुरुग्राम = रयान इंटरनॅशनल शाळेतील विद्यार्थी प्रद्युम्न मृत्यू प्रकरणी सर्व शिक्षकांची होणार चौकशी, सर्व शिक्षक शाळेत हजर.


मुंबई दिशेने जाणाऱ्या मार्गावरवाशी खाडी पुलाची प्लेट निघाल्याने एकेरी वाहतूक सुरू. ऐन गर्दीच्या वेळी घटना घडल्याने वाहतूक कोंडी. दुरुस्तीचं काम वेगात

कुठल्याही देशाच्या विकासात वाहतूक व्यवस्था महत्वाची भूमिका बजावते - नरेंद्र मोदी.

उत्तर प्रदेश - यमुना नदीत बोट उलटून झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला. 19 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती.


बुलेट ट्रेनचे भूमिपूजन होतेय त्याचे सर्व श्रेय शिंजो अबे यांना जाते - पंतप्रधान मोदी.

जपानची शिंकासेन सेवा सुरु झाल्यापासून एकही अपघात झालेला नाही - शिंजो अबे.

100 पेक्षा जास्त जपानी इंजिनिअर भारतात दाखल झाले आहेत, भारत आणि जपानी इंजिनिअर एकत्र मिळून काम करत आहेत - शिंजो अबे.

माझे प्रिय मित्र मोदी जागतिक आणि दूरदृष्टी असलेले नेते आहेत - शिंजो अबे.

1964 मध्ये जपानच्या विकासाची सुरुवात झाली, नव्या जपानचा पूर्नजन्म झाला, दुस-या महायुद्धानंतर जपानची वाताहात झाली आहे - शिंजो अबे.

दहा वर्षापूर्वी भारतीय संसदेत भाषणाची संधी मिळाली होती. जपान आणि भारताचे द्विपक्षीय संबंध दृढ असून, ताकतवार भारत आणि ताकतवर जपान दोघांच्या फायद्याचे आहेत - शिंजो अबे.


आजचा दिवस ऐतिहासिक आहे, भारत-जपानमध्ये नव्या अध्यायाची सुरुवात होत आहे - शिंजो अबे.

जपानचे पंतप्रधान शिंजो अबे यांनी नमस्कार करुन केली भाषणाची सुरुवात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिंजो अबे यांच्या हस्ते देशातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाच भूमिपूजन संपन्न.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बडोद्यातील प्रशिक्षण केंद्राचे केले उदघाटन.

नाशिक जिल्ह्यातील पाच ठिकाणी आयकर विभागाच्या कांदा व्यापाऱ्यांवर आज धाडी.  लासलगाव ,पिंपळगाव बसवंत ,चांदवड, येवला,सटाणा या गावातील 7 कांदा व्यापाऱ्यांवर मारले छापे.


बुलेट ट्रेनची पायाभरणी तुम्ही अहमदाबाद मध्ये करताय पण उदघाटन मुंबईत करा - देवेंद्र फडणवीस.


पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मदतीमुळे जपानने 30 हजार कोटी रुपये महाराष्ट्राला दिले त्यामुळे महाराष्ट्रात विकास प्रकल्प सुरु आहेत.

देश तसेच महाराष्ट्र आणि गुजरातला फायदा होईल यामुळे रोजगार निर्मिती होईल - देवेंद्र फडणवीस.

मारुती बरोबरच्या पार्टनरशिपमुळे भारतात ऑटो उद्योगाला चालना मिळाली.

भारतात परिवर्तन घडेल आणि बुलेट ट्रेनचा प्रवास स्वस्तात उपलब्ध असेल.

बुलेट ट्रेनचे तंत्रज्ञान आणि स्वस्तात निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल जपानचे आभार मानतो - पियुष गोएल.

कल्याण रेल्वे स्थानकात जीआरपीची कारवाई. लोकल मध्ये जागा अडविणाऱ्या महिला ताब्यात. जागा अडविणाऱ्या 15 ते 20 महिला जीआरपीच्या ताब्यात. सापळा रचून जीआरपीने केली कारवाई.


पिंपरी = तीन वर्षीय चिमुरड्याला मारहाण प्रकरण. मारहाण करणाऱ्या शिकवणी शिक्षिकेवर गुन्हा दाखल. बाल संरक्षण कायद्यानुसार शिक्षिकेवर गुन्हा दाखल. मुलाला लाकडी पट्टीने जबर मारहाण.

रोहिंग्या मुस्लिमांविरोधात म्यानमारमध्ये सुरू असलेली लष्करी कारवाई बंद करण्याचे संयुक्त राष्ट्र संघाची आवाहन.


उत्तर प्रदेश = भरधाव बाईक कालव्यात कोसळून तीन जणांचा मृत्यू, गाझियाबाद मधील घटना.


राजस्थान = मागील 13 दिवसांपासून सिकर आणि इतर जिल्ह्यांमध्ये सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन स्थगित. सरकार सोबत झालेल्या चर्चेनंतर आंदोलनाला स्थगिती.

क्वाललम्पुर येथे एका शाळेत लागलेल्या आगीत 25 जणांचा मृत्यू, मृतांमध्ये विद्यार्थ्यांचाही समावेश.


कोल्हापुरात मुसळधार पावसाची हजेरी, रामानंद नगरमध्ये अनेक घरांत शिरलं पावसाची पाणी.'

बुलेट ट्रेन मधूल मुंबईची लुट होऊ नये, सामना संपादकीयातून केंद्र सरकारला टोला.


वॉशिंग्टन = फ्लोरिडा येथील नर्सिंग होमचे एअर कंडिशनर ‘इरमा’ चक्रीवादळाने नादुरुस्त झाल्याने सहा रुग्णांना प्राण गमवावे लागले.

अकोले तालुक्यातील मन्याळे गावातील भैरवनाथ जाधव या शेतकऱ्याने मंत्रालयात जाऊन केले विषप्राशन

No comments:

Post a Comment