तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Friday, 8 September 2017

लंकेश गौरी यांच्या हत्येचा सर्वच स्तरातून जाहीर निषेध - सुभाष मुळे


विशेष प्रतिनिधी....
------------------
गेवराई, दि. 8 : ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्येनं संपूर्ण कर्नाटक राज्यच नव्हे तर पत्रकारिता क्षेत्र देखील हादरून गेलं आहे. या घटनेचा जाहीररित्या तिव्र शब्दात आपण निषेध करत आहोत असे सांगून हल्लेखोरांना तात्काळ अटक करून कठोर कार्यवाही करण्याची मागणी गेवराई तालुका पत्रकार संघाचे सचिव सुभाष मुळे यांनी केली आहे.
        कर्नाटक राज्यातील बंगळुर येथे ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांना गोळ्या झाडुन क्रुरतेने हत्या करण्यात आली आहे. अशा प्रकारे हत्या करून वास्तव दाबण्याचा प्रयत्न हल्लेखोरांचा दिसतो. या घटनेमागील वास्तव समोर येणे गरजेचे आहे. विचाराचा लढा विचारानेच हवा रक्तपाताने नव्हे. या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करून हल्लेखोरांना तात्काळ अटक करावी व या हल्ल्यामागे खरे सुत्रधार कोण आहेत हे समोर यावे. यासाठी शासनाने कठोर भुमिका घ्यावी अन्यथा पत्रकार लोकशाही पध्दतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडेल असा इशारा पत्रकार संघाचे सचिव सुभाष मुळे यांनी दिला आहे.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी , गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

No comments:

Post a Comment