Breaking News
Loading...

Friday, 15 September 2017

'स्वच्छता हिच सेवा' या मोहिमेत सहभागी व्हावे - भागवत बिघोत

सुभाष मुळे...
------------------
गेवराई, दि. 15 __ नागरी स्वराज्य संस्थेने दि.15 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर पर्यंत 'स्वच्छता हिच सेवा' ही मोहीम सुरू केली आहे. गेवराई शहरातील नागरिकांनी या मोहिमेत सहभागी होऊन स्वच्छ गेवराई सुंदर गेवराई हे ब्रिद मनाशी बाळगून आपले शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सामाजिक संस्थेने सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी भागवत बिघोत यांनी केले आहे.
       स्वच्छता हिच सेवा मोहीमेचा शुभारंभ शुक्रवार, दि.15 सप्टेंबर रोजी गेवराई नगर पालिकेचे स्वच्छता व पाणी पुरवठा सभापती जानमंहमद बागवान यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी मुख्यधिकारी भागवत बिघोत, सभापती याहीया खाॅन, संजय इंगळे, भरत गायकवाड, अजित कानगुडे, कृष्णा काकडे, शाम येवले आदि उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्याधिकारी भागवत बिघोत म्हणाले की, गेवराई शहरातील जनतेच्या सहकार्याने नगर पालिकेला मराठवाड्यातून स्वच्छतेचे पारितोषक मिळाले आहे. 'नागरिक स्वच्छता हिच सेवा' मोहीम सुरू करण्यात आली असून सामाजिक संस्थेने सहकार्य करून जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा असे आवाहन देखिल मुख्यधिकारी भागवत बिघोत यांनी केले.
      यावेळी कैलास मडकर, आर. ए. वाव्हळे, भागवत येवले, अरूण जोशी, अनिल काळे, दिपक देशपांडे, टि.के. निकम, एकनाथ लाड, विष्णू कांडेकर, राजू बागवान, प्रकाश हाटोटे, प्रकाश रानमारे, दिलीप निकम, दिनेश औटी, मस्के मॅडम, ज्ञानेश्वर सौदरमल, राम सौदरमल, संतोष मोटे आदि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

No comments:

Post a Comment