तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 30 September 2017

पो.नि उदयसिंह चंदेल यानी पकडली चोरटी होणारी अवैध दारू

वसमत : रामु चव्हाण

वसमत शहर पोलिसांनी चोरटी  दारु विक्री करणा-या विरुद्ध कार्यवाही करत 28000 रुपयांची दारु पकडली आहे 
   वसमत शहरात एका घरात अवैध दारू विक्री होत असल्या बाबत मिळालेल्या  गोपनीय महितीवरुन पो.नि.उदयसिंह चंदेल यांच्या मार्गदर्शना खाली सपोनि सय्यद आजम,पोहेका राजु सिद्दीकी,शंकर हेन्द्रे,वाघमारे,केंद्रे,हलीमा शेख आदिच्या पथकाने  दि 30 सप्टेंबर रोजी दुपारी 2:30 वाजता वसमत येथील रेल्वे स्थानक जवळील रतनसिंग चतुर सिंग चव्हाण यांच्या घरा समोर विना परवाना चोरटी विक्री करण्या च्या उद्देशाने लपवून ठेवलेल्या देशी दारु जॅकपॉट व देशी दारु संत्रा,टैंगो पंच,च्या एकूण 467 बाटल्या 28000 रुपय किमतीची दारु जप्त करुण या प्रकरणी सपोनि सय्यद आजम यांच्या फिर्यादि वरुण रतनसिंग चतुर सिंग चव्हाण यांच्या विरुद्ध विविध कलमान्वये वसमत शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सपोनि सय्यद आझम यांच्या पथकाने  28 हजार  रुपयांची दारु पकडली आहे दोन दिवसात दोन धाडसी कार्यवह्याने अवैध दारु विक्रेत्याची चिंता वाढवली असुन पोलीस विभागाच्या या कार्याचे सर्वत्र अभिनंदन  होत आहे प्रकरणाचा पुढील तपास पो.ना शेख जावीद हे करीत आहे

छाया - नंदु परदेशी, श्रीधर वाळवंटे, नागेश चव्हाण

No comments:

Post a Comment