तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Saturday, 16 September 2017

इरा पब्लिक स्कूलमध्ये हिंदी दिन

सुभाष मुळे...
------------------
गेवराई, दि. 16 __ गेवराई शहरातील इरा पब्लिक स्कूलमध्ये हिंदी दिन गुरूवारी साजरा करण्यात आला. व्यासपीठावर  रेणुका संभाहरे, मुख्याध्यापक गणेश क्षीरसागर, दिपा गाडे यांची उपस्थिती होती.
     पुढे बोलताना रेणुका संभाहरे म्हणाल्या की, हिंदी भाषेला मोठे महत्व आहे. हिंदी भाषा ही राष्ट्र भाषा असून देशातील नागरिकांना संवाद साधण्याचे मुख्य साधन आहे. भारतीय राज्य घटनेने हिंदी भाषेला राष्ट्र भाषेचा दर्जा दिला आहे. 14 सप्टेंबर हा दिवस संपूर्ण देशभर "हिंदी दिवस‘ म्हणून साजरा केला जातो.  प्रत्येकाचा कल इंग्रजी भाषा बोलण्याकडे आणि शिकण्याकडे जास्त आहे. परंतु इंग्रजी भाषेसोबत आपण हिंदी भाषेला तेवढेच महत्त्व दिले पाहिजे, कोणत्याही भाषेचे सखोल ज्ञान असणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
    कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रेमला कुलकर्णी, अमृता मोटे, रोहिणी जोशी, दिपाली जोशी, निशा शिंदे, वर्षा चाळक, ज्योती नागरे, रश्मी बरसाले, वर्षा मस्के , सुमैया पठाण, विजया परळकर, वर्षा घरत, कालींदा खराडे आदीनी परीश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूञसंचालन वैशाली कापसे यांनी केले तर शेवटी आभार ज्योती नागरे यांनी मानले.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

No comments:

Post a Comment