तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Saturday, 16 September 2017

मुंबईतील प्रसिद्ध आर. के. स्टुडिओची आग आटोक्यात.

_________________________

चित्रपटसृष्टीचे शोमॅन अशी ओळख असलेल्या राज कपूर यांच्या सुप्रसिद्ध आर.के. स्टुडिओला शनिवारी आग लागली. मुंबईतील चेंबुर परिसरात असलेल्या स्टुडिओला दुपारी अडीच वाजताच्या सुमारास आग लागली. याआगीत स्टुडिओ 1 आणि स्टुडिओ 2 आगीत जळून खाक झाले.अग्निशमन दलाच्या 11 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. त्यानंतर काही काळ कूलिंग ऑपरेशन सुरु होतं. शॉर्ट सर्किटमुळे स्टुडिओला आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. आगीच्या ज्वाळांमध्ये स्टुडिओचं छत कोसळल्याचीही माहिती आहे. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार आग लागली त्यावेळी या स्टुडिओत ‘डान्स इंडिया डान्स’ या कार्यक्रमाचं चित्रिकरण सुरु होतं. आगीत स्टुडिओमधील शूटिंगचं बरंचसं सामान जळून खाक झालं. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.या आगीमुळे चेंबूर नाका परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. सायन फ्रीवे तसंच नवी मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या रस्त्यांवर वाहनांची गर्दी झाली.

No comments:

Post a Comment