तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Monday, 11 September 2017

जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या नाव नोंदणीस प्रतिसाद  वीर सावकर विचारमंच परभणी


परभणी (प्रतिनिधी)- वीर सावरकर विचारमंच परभणी आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा १६ सप्टेंबर २०१७ रोजी सकाळी ९ वाजता श्री शिवाजी महाविद्यालय सभागृह, वसमतरोड परभणी येथे आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेच्या नाव नोंदणीस उत्कृष्ट प्रतिसाद मिळत असून विद्यार्थ्यांच्या मागणीचा विचार करता नाव नोंदणीस १४ सप्टेंबर सायंकाळपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 

परभणीचे वीर सावरकर विचारमंचातर्फे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा २०१७ आयोजन करण्यात आले असून केवळ कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा राहणार आहे. सावरकरांचा राष्ट्रवाद हा विषय या वक्तृत्व स्पर्धेत ठेवण्यात आला आहे.  या स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतिय स्पर्धकांना अंदमान सहल आणि उत्तेजनार्थ दोन सन्मानचिन्ह आणि सहभागी स्पर्धकास सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. विषय मांडणीसाठी प्रत्येक स्पर्धाकास जास्तीत जास्त १० मिनीटे वेळ देण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी महाविद्यालयाचे ओळखपत्र आणि प्राचार्यांचे पत्र बंधनकारक आहे. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा १७ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता श्री शिवाजी महाविद्यालय सभागृह येथे निवृत्त सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांच्या उपस्थितीत होणार आहे. स्पर्धेच्या अनुषंगाने प्रत्येक महाविद्यालयातही जय्यत तयारी सुरू असून स्पर्धकांकडून तयारीही करून घेण्यात येत आहे. जिल्ह्यातील इतर महाविद्यालयीन विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन वीर सावरकर विचारमंचच्या वतीने करण्यात आले आहे. नोव नोंदणीसाठी दैनिक गोदातीर समाचार स्टेशनरोड, परभणी, तसेच  डॉ.नवनित मोरे (९३८९८७१२८८), विनोद डावरे (९७६५९९८९९९), विजय अग्रवाल (९५५२०८६३४१) यांच्याशी संपर्क साधावा.

No comments:

Post a Comment