Breaking News
Loading...

Thursday, 14 September 2017

येडशी येथे शिवसेना-भाजपला खिंडार, असंख्य कार्यकर्त्यांचा आज राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश

आकाश लष्करे
उस्मानाबाद(जिल्हा प्रतिनिधी)

येडशी ता.उस्मानाबाद येथील शिवसेना व भाजपच्या असंख्य कार्यकर्त्यांनी माजी मंत्री डॉ.पद्मसिंहजी पाटील साहेब, आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा सौ.अर्चनाताई पाटील यांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत जाहीर प्रवेश केला. आज दि.१३/०९/२०१७ रोजी राष्ट्रवादी भवन, उस्मानाबाद येथे पार पडलेल्या प्रवेश कार्यक्रमात येडशी येथील सेना-भाजप व इतर पक्षातील कार्यकर्ते श्री.बाजीराव देशमुख, अनिल अवधूत, मोहन देशमुख, गणेश देशमुख, सुरेश देशमुख, बालाजी देशमुख, अशोक देशमुख, अजिंक्य गोरे, हेमंत खोबरे, गणेश देशमुख, अतुल देशमुख, रामेश्वर देशमुख, महेश देशमुख, यशवंत देशमुख, जयराम देशमुख, किरण देशमुख, संतोष देशमुख, ज्ञानेश्वर देशमुख, भारत देशमुख, शंकर देशमुख, समाधान देशमुख यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा समावेश आहे. या सर्व कार्यकर्त्यांचे उपाध्यक्षा सौ.अर्चनाताई पाटील यांनी राष्ट्रवादीत स्वागत पुढील कार्यास सर्वांना शुभेच्छा दिल्या. येडशी येथील येत्या ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वतोपरी अथक प्रयत्न करून ग्रामपंचायतवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकावून आ.राणाजगजितसिंह पाटील साहेब याचे हात बळकट करण्याचा यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी संकल्प बोलून दाखवला.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक सतीश दंडनाईक, जि.प.सदस्य महेंद्र धुरगुडे, पं.स.सदस्य संजय काका लोखंडे, रामचंद्र देशमुख,माजी सभापती अकबर तांबोळी, राहुल पताळे, जयंत भोसले, उल्हास कंकाळ, माजी पं.स.सदस्य नागाप्पा पवार, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, सोशल मीडिया प्रमुख इरशाद काझी आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment