तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Friday, 15 September 2017

जगासाठी डोकेदुखी ठरलेल्या उत्तर कोरियाचं भारत कनेक्शन!


_________________________

उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उनने पुन्हा एकदा जपानच्या भूभागावरुन मिसाईल डागून खळबळ उडवली. गेल्या एका महिन्यात जपानच्या भूभागावरुन मिसाईलची चाचणी करण्याची उत्तर कोरियाची ही दुसरी वेळ आहे. तब्बल 770 किलोमीटर उंचावरुन गेलेल्या या मिसाईलने 3700 किलोमीटर पर्यंतचा प्रवास केला. उत्तर कोरियाच्या या आगळीकीमुळे जपानने आपल्या नागरिकांना खबरदारीचा इशारा दिला आहे. तसंच दक्षिण कोरियाच्या राष्ट्रपतींनी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची तातडीची बैठक बोलावली. महत्वाचं म्हणजे काही दिवसांपूर्वीच संयुक्त राष्ट्रसंघाने उत्तर कोरियावर निर्बंध घातले आहेत. मात्र, तरीही किम जोंग उनने युद्धखोरपणा सोडलेला नाही.

उत्तर कोरियाचं भारत कनेक्शन....

उत्तर कोरियाच्या सर्वात मोठ्या व्यावसायिक भागीदारांमध्ये भारताचा तिसरा क्रमांक लागतो. चीन उत्तर कोरियाचा सर्वात मोठा व्यावसायिक भागीदार आहे. त्या खालोखाल, सौदी अरब आणि भारताचा क्रमांक लागतो. भारताकडून उत्तर कोरियात निर्यात केली जाते.गेल्या वर्षी 2016-17 मध्ये भारत आणि उत्तर कोरिया यांच्यात 872 कोटींचा व्यवहार झाला. भारताने उत्तर कोरियात 301 कोटी रुपयांच्या वस्तू निर्यात केल्या, तर 570 कोटींच्या वस्तू भारतानेही उत्तर कोरियाकडून खरेदी केल्या.

उत्तर कोरिया बाबत भारताची भूमिका काय...?

दरम्यान उत्तर कोरियाबाबत भारताने कडक भूमिका घेतली आहे. उत्तर कोरियाचं वर्तन पाहता आणि संयुक्त राष्ट्राने घातलेल्या निर्बंधानंतर भारताने उत्तर कोरियाशी व्यवहार बंदकेला आहे. सध्या भारताकडून केवळ खाण्यापिण्याच्या वस्तू आणि औषधं निर्यात केली जातात. खाण्याच्या वस्तूंचा तुटवडा जाणवू नये यासाठी भारताकडून 2002 पासून उत्तर कोरियात निर्यात केली जाते. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात हा निर्णय घेण्यात आला होता. 2001 साली भारताने उत्तर कोरियाला एक मिलियन डॉलरची आर्थिक मदतही केली होती. यावर्षी 21 एप्रिलला मोदी सरकारने गॅझेट नोटिफिकेशन जारी केलं होतं. त्यानुसार, भारताचा कोणताही नागरिक किंवा कंपनी उत्तर कोरियाला अशी कोणतीही मदत करणार नाही, ज्यामुळे उत्तर कोरियाला अणुबॉम्ब चाचणीला मदत होईल.

भारत आणि उत्तर कोरियाचे संबंध...

भारताचे उत्तर कोरियासोबतचे संबंध हे 1970 सालापासून आहेत. मात्र हे संबंध नेहमीच मर्यादित स्वरुपाचे होते. भारत उत्तर कोरियाला भीत नसला तरी प्रत्येक पाऊल हे काळजीपूर्वक उचललं जातं. यूपीए सरकारच्या कार्यकाळात उत्तर कोरियाच्या लष्कराला भारतीय सैन्याने प्रशिक्षण दिलं होतं. मोदी सरकारच्या कार्यकाळातच उत्तर कोरिया आणि भारत यांच्या द्विपक्षीय भेटींना सुरुवात झाली. 2015 मध्ये पहिल्यांदाच उत्तर कोरियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी भारताचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे उत्तर कोरियाला लूक ईस्टपॉलिसीमध्ये सहभागी करुन घेण्याची मागणी केली.उत्तर कोरियाशी संबंध नसले तरी भारताचं काहीही अडणार नाही. मात्र भारत कधीही या देशाला दुर्लक्षित करत नाही. कारण भारताचे दोन शत्रू चीन आणि पाकिस्तानशी उत्तर कोरियाचे चांगले संबंध आहेत. उत्तर कोरियाच्या 95 टक्के गरजा चीनकडून पूर्ण केल्या जातात. 2015 साली संयुक्त राष्ट्रात उत्तरकोरियाविरोधात वातावरण निर्माण झालं तेव्हा भारताने उत्तर कोरियाचा विरोधही केला नाही किंवा समर्थनही दिलं नाही. उत्तर कोरिया विरोधातील मानवी हक्क उल्लंघनाच्या प्रस्तावाला मतदान न करण्याचा निर्णय भारताने घेतला होता. शिवाय उत्तर कोरियाचा शेजारी देश दक्षिण कोरियाचा मोदींनी दौराही केला आहे. मात्र उत्तर कोरियाचा दौरा मोदींनी अद्याप केलेला नाही. उत्तर कोरियाच्या नागरिकांना खाण्यासाठी स्वतःचं अन्न नाही. चीन आणि भारता सारख्या देशांमधून खाण्यापिण्याच्या वस्तूंची निर्यातकेली जाते. मात्र या देशाने आण्विक शक्ती तयार केली आहे. उत्तर कोरियाने पाकिस्तानला आण्विक तंत्रज्ञान दिलं होतं.उत्तर कोरिया भारताचा मित्रही नाही किंवा शत्रूही नाही. मात्र उत्तर कोरियाचा सामना करण्यासाठी भारताने अमेरिकेसोबत असावं, अशी डोनाल्ड ट्रम्प यांची इच्छा आहे.

No comments:

Post a Comment