Breaking News
Loading...

Saturday, 9 September 2017

जिल्हा युवा मंडळ पुरस्कारासाठी आवाहन

 

परभणी
: भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रिडा मंत्रालयाअंतर्गत नेहरु युवा केंद्र, परभणी यांच्यातर्फे दरवर्षी युवा विकासाच्या क्षेत्रात उल्लेखणीय कार्य करणाऱ्या संलग्नीत युवा मंडळाला जिल्हा युवा मंडळ पुरस्कार दिला जातो. दिनांक 01 एप्रिल 2016 ते 31 मार्च 2017 या आर्थिक वर्षात युवा मंडळाने केलेल्या युवा विकास क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी हा पुरस्कार दिला जाणार आहे. नेहरु युवा केंद्र, परभणी कार्यालयातर्फे आरोग्य शिबीर, व्यवसाय प्रशिक्षण, क्रीडा स्पर्धा, विविध शिबीरे, सांस्कृतीक कार्यक्रम, स्वच्छता, पर्यावरण, युवा आदान प्रदान कार्यक्रम, राष्ट्रीय एकता कार्यक्रम, महिला सबलीकरण, स्वयंरोजगार, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दिन सामाजीक कार्यक्रम इत्यादी विविध क्षेत्रात कार्य केलेल्या संलग्नीत युवा मंडळांना हा पुरस्कार दिला जाणार आहे. पुरस्काराचे स्वरुप रुपये 25,000/- धनादेश व प्रशस्ती पत्र कार्यालयाकडून देण्यात येणार आहे. परभणी जिल्हयातील संलग्नित युवा मंडळ, महिला मंडळ, क्रीडा मंडळ, व्यायामशाळांनी अर्जाबरोबर मंडळाचे नोंदणी प्रमाणपत्र, घटना, आर्थिक वर्षात केलेल्या कामाचा पुरवा, लेखा परिक्षण, ग्राम पंचायत कार्यालयाकडून शिफारशीसह सर्व मंडळांनी विहित नमुन्यामध्ये अर्ज करावे. अर्जाचा नमुना कार्यालयात उपलब्ध आहे. पुर्ण भरलेले अर्ज नेहरु युवा केंद्र डॉ.वाकुरे हॉस्पीटल, व्यंकटेश नगर, कारेगांव रोड, परभणी या ठिकाणी दिनांक 25 सप्टेंबर 2017 पर्यंत जमा करावेत. या योजनेचा फायदा जास्तीत जास्त युवा मंडळांनी घ्यावा असे आवाहन जिल्हा युवा समन्वयक, नेहरु युवा केंद्र, परभणी यांनी केले आहे. 

00000

No comments:

Post a Comment