तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Thursday, 14 September 2017

रायन ग्रुपच्या पिंटो कुटुंबाचा अटकपूर्व जामीन हायकोर्टाने फेटाळला.


_________________________

रायन इंटरनॅशनल स्कूलचे सर्वेसर्वा असलेल्या पिंटो परिवाराची अटकपूर्व जामिनाची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. हरियाणा कोर्टात दाद मागण्यासाठी याचिकाकर्त्यांना उद्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.मात्र ही संधी प्राप्त करण्यासाठी गुरुवारी रात्री 9 वाजेपर्यंत पिंटो कुटुंबीयांना आपले पासपोर्ट मुंबई पोलिस आयुक्तालयात जमा करणं अनिवार्य करण्यात आलं आहे. जर पासपोर्ट जमा करण्यात पिंटो कुटुंबीय अपयशी ठरलं तर त्यांना उद्या संध्याकाळ पर्यंतची संधी मिळणार नाही, असं हायकोर्टाने स्पष्ट केलं आहे. रायन इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक ऑगस्टिन पिंटो, त्यांच्या पत्नी आणि व्यवस्थापकीय संचालक ग्रेस पिंटो यांच्यासह त्यांचा मुलगा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रायन पिंटो यांनी अटक पूर्व जामीनासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. दरम्यान मुंबई हायकोर्टातील याचिकेत पीडित मुलाच्या पालकांकडूनही मध्यस्थ याचिका दाखल करण्यात आली होती. मानवतेच्या दृष्टीकोनातून अटकपूर्व जामीन फेटाळावा, असा युक्तिवाद त्यांच्याकडून करण्यात आला. तसंच प्रद्युम्न ठाकूर या मुलाची हत्या ज्या क्रुरतेने करण्यात आली, त्यानुसार ही घटना दुर्मिळात दुर्मिळ या वर्गात मोडते, असा दावाही त्यांच्या कडून करण्यात आला.गुरूग्राम येथील रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये दुसरीतील एका मुलाचा निर्दयीपणे खून केला. हत्येआधी या मुलावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची कबुली अटकेत असलेल्या आरोपीने दिली आहे. याप्रकरणी गुरुग्राम येथील रायन इंटरनॅशनल शाळेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या वतीने हायकोर्टात दावा करण्यात आला की, “या प्रकरणी हरियाणा कोर्टाचीही बाजू ऐकून घेणं गरजेचं आहे. सुप्रीम कोर्टाने यासंदर्भातील प्रकरणात तसे निर्देश दिले आहेत, हे सिद्ध करण्याकरता त्यांनाही बाजू मांडण्याची संधी देण्यात यावी.”हायकोर्टाने ही विनंती मान्य केली खरी मात्र मुळात हे प्रकरण हरियाणाच्या कोर्टात सुरु आहे. याप्रकरणी एका पालक संघटनेच्या वतीने अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी या अटकपूर्व जामिनाला विरोध करणारी याचिका दाखल करण्याची परवानगी हायकोर्टाकडे मागितली होती मात्र ती फेटाळण्यात आली.

No comments:

Post a Comment