तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Thursday, 14 September 2017

सोनपेठ महावितरणच्या मनमानीमुळे नागरिक वैतागले


तेजन्युज हेडलाईन्स प्रतिनिधी
सोनपेठ :  येथील महावितरणच्या कारभाराला नागरिक वैतागले असून प्राथमिक आरोग्य केंद्राचीसुद्धा विजबिल न भरल्याचे कारण देत विज जोडणी कापली. यामुळे येथील उपचार घेण्यासाठी आलेल्या रूग्णांना नाहक मोठा ञास सहन करावा लागला. तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.सुभाष पवार यांनी महावितरणच्या अधिका-यांना आपले कार्यालय हे
आत्यावश्यक सेवा आसणारे कार्यालय आहे आणि आम्हाला अधिकचे बिल आले आसुन आमच्या मिटर रिडिंगनुसार बिलाची मागणी केल्याने आरोग्य केंद्राची विज तिन तासानंतर जोडली.
येथील आरोग्य केंद्राची विज महावितरणने कुणाच्या सांगण्यावरून कापली हे सुध्दा महत्वाचे आहे.
तालुक्यातील महावितरणच्या सावळ्या गोंधळामुळे येथील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
तालुक्यातील काही गावे आंधारात आसल्याचेही येथील अधिकाऱ्यांना याचे कसलेही गांभीर्य राहिले नसुन शहरातील विजपुरवठा सुध्दा सुरूळीत नाही
शहरात सतत खंडीत होणाऱ्या विजपुरवठ्यामळे येथील नगरपरिषेदेच्या वतिने शहराला होत आसलेल्या पाणीपुरवठ्यावर सुध्दा मोठा परिणाम झाला आहे.
शहरात सतत गायब होत आसलेल्या विजेबाबत येथील महावितरणच्या कार्यालयात फोन करून विचारत आसलेल्या नागरिकांना येथील अधिकारी सुध्दा अर्वाच्य भाषेत बोलत असल्याच्या तक्रारी सुध्दा वाढत आहेत.
तालुक्यातील गोदाकाठचे उपेक्षित आसलेले बरेच गावं व्यवस्थित न होना-या विजपुरवठ्याबाबत त्रस्त आसुन याबाबत महावितरणचे कार्यालय माञ वसुलीच नसल्याचे कारण दाखवत त्या गावाकडे दुर्लक्ष करत आहेत.

No comments:

Post a Comment