तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Monday, 11 September 2017

स्व नितिन महाविद्यालयात विविध अभ्यास मंडळाची स्थापना

पाथरी/प्रतिनिधी:- येथिल स्व नितिन कला व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात सोमवार ११ सप्टेबर रोजी विविध अभ्यास मंडळाची स्थापणा करण्यात आली.
या वेळी मराठी भाषा व वाड़मय अभ्यास मंडळाची स्थापना प्रा दत्ता बडूरे एनएसबी महाविद्यालय नांदेड यांच्या हस्ते संपन्न झाले.या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्राचार्य डॉ राम फुन्ने हे होते तर प्रमुख पाहूने म्हणून प्रा डॉ सुरेश सामाले, मराठी विभाग प्रमुख प्रा डॉ गणपती मोरे, प्रा डॉ मारोती खेडेकर यांची उपस्थिती.या कार्यक्रमाचे प्रास्तविक आणि सुत्र संचलन प्रा डॉ आनंद इंजेगावकर यांनी केले.याच वेळी इतिहास अभ्यास मंडळाची स्थापना व उदघाटन प्रा डॉ संतोष कोंडूरवार नेताजी महाविद्यालय नांदेड यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्राचार्य डॉ राम फुन्ने हे होते तर प्रमुख उपस्थितीत प्रा अंकूश सोळंके, प्रा सौ पवार मॅडम, ग्रंथपाल कल्यान यादव हे होते या कार्यक्रमाचे सुत्र संचलन आणि प्रास्ताविक प्रा डॉ जगन्नाथ बोचरे यांनी केले तर आभार प्रा डॉ हनुमान मुसळे यांनी मानले. या नंतर सांस्कृतीक सभागृहात समाजशास्र विद्यार्थी परिषदेचे उदघाटन प्रा डॉ बिभिषन करे यांच्या हस्ते करण्यात आले या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्राचार्य डॉ राम फुन्ने हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा डॉ तरोडे हे होते या वेळी मंचावर प्रा सौ अर्चना बदने, प्रा डॉ सुंदर गजमल यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सुत्र संचलन प्रा मधूकर ठोंबरे यांनी केले तर आभार प्रा तुळशीदास काळे यांनी मानले. विविध अभ्यास मंडळाच्या स्थापना कार्यक्रमा साठी मोठ्या संखेने महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment