तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Friday, 8 September 2017

पत्रकार गौरी लंकेशच्या हत्येचा शोध घेऊन खुन्यावर कारवाई करा


पत्रकार संघाची मागणी
प्रा. डॉ. संतोष रणखांब
तेजन्युज हेडलाईन्स प्रतिनिधी
सोनपेठ : येथिल तालुका पत्रकार संघाच्या वतीने तहसिलदार सोनपेठ यांना निवेदन सादर करून निषेध करण्यात आला आहे. तसेच खून करणाऱ्याचा शोध घेऊन तात्काळ कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येने सर्व देश हादरला असून पत्रकारांवर होणारे हल्ले तसेच पत्रकारांचे खून या घटनामध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे पत्रकार संरक्षण कायदा करावा. ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा पत्रकार संघ सोनपेठ निषेध करत आहे, असे निवेदनात नमुद करण्यात आले आहे.
नायब तहसिलदार एच. यू. मोरे यांना निवेदन सुपूर्द करण्यात आले. या निवेदनावर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अतुल कोरपे, बालासाहेब भोसले, भागवत पोपडे, सिद्धेश्वर गिरी, देवानंद सौंदळे, रविंद्र देशमुख, मल्लिकार्जून सौंदळे, प्रा. डॉ. संतोष रणखांब, सुदर्शन डाके, महादेव मोटे, गजानन चिकणे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

No comments:

Post a Comment