तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Sunday, 10 September 2017

जेनेरिक औषधांचा आग्रह धरा : सुभाष देसाई

गंगापुर प्रतिनिधी

नामांकित कंपन्यांची औषधी आणि जेनेरिक औषधी एकच आहेत. ब्रँडेड कंपन्यांची औषधी महागडी असते तर जेनेरिक औषधी स्वस्त असतात. सामान्यांना परवडणारी अशी जेनेरिक औषधी आहे.  त्यासाठी सर्वांनी लोकचळवळ उभारुन जेनेरिक औषधीचा आग्रह धरावा, असे आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले. 

 गंगापूर येथील हेल्प हयुमिनिटी फाऊंडेशनच्या जेनेरिक स्वस्त औषधी दुकानाच्या उद्घाटनप्रसंगी श्री. देसाई बोलत होते. यावेळी खासदार चंद्रकात खैरे, आमदार आर.एम. वाणी, श्रीक्षेत्र सरला बेटचे रामगिरी महाराज, नगराध्यक्ष वंदना पाटील, अण्णासाहेब माने, लक्ष्मण सांगळे, कृष्णा पाटील डोणगावकर, संजय जाधव, फाउंडेशनचे अध्यक्ष ॲड. रियासत अली, भाऊसाहेब बाराहाते, कल्याण बाराहाते, नितीन बाराहाते यांची उपस्थिती होती.

 उद्योगमंत्री देसाई म्हणाले, ब्रँडेड औषधी महागडी असल्याने सामान्यांना परवडणारी जेनेरिक औषधीच आहे. 45 वर्षापूर्वी पासून ‘प्रबोधन’ संस्थेच्या माध्यमातून सामान्यांच्या हितासाठी कार्य करण्यात येते आहे. आतापर्यंत या संस्थेच्या माध्यमातून 13 जेनेरिक औषधी दुकानांची निर्मिती केली आहे. राज्यात अशा हजारो दुकानांची आवश्यकता असल्याने प्रत्येकाने जेनेरिक औषधींचा आग्रह धरुन डॉक्टरांनाही जेनेरिक औषधी लिहून देण्यासाठी विनंती करावी. जेनेरिक औषधी बँडेड औषधी यात कोणताही फरक नाही. दोन्ही औषधींचे गुणधर्म एकसारखेच असल्याचे श्री. देसाई यांनी यावेळी सांगितले. जेनेरिक औषधीच्या या प्रामाणिक व्यवसायातून स्वार्थ, परमार्थ साधल्या जातो. त्यामुळे तरुणांनी यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहनही श्री. देसाई यांनी केले.

 खासदार चंद्रकांत खैरे यांनी मानवाला जीवनात पाणी जितके महत्त्वाचे आहे. तितकेच औषधींचेही महत्त्व असल्याचे सांगून जेनेरिक औषधीचा उपयोग करावा, असे सांगितले. 
प्रास्ताविक आमदार आर.एम. वाणी यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आबासाहेब शिरसाट यांनी केले. आभार योगेश धोत्रे यांनी मानले.

No comments:

Post a Comment