तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Saturday, 16 September 2017

धोंडराई शाळेला तालुकास्तरीय कब्बडी स्पर्धेत उपविजेते पद

सुभाष मुळे...
-----------------
गेवराई, दि. 16 __ बीड जिल्हा क्रीडा समितीच्या वतीने र.भ. अट्टल महाविद्यालयात तालुकास्तरीय कब्बडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत तालुकाभरातून 14 वर्ष वयोगट व 17 वर्ष वयोगटाचे अनेक संघ सहभागी झाले.
     या स्पर्धेत जि. प.मा.शा. धोंडराई प्रशालेच्या 14 वर्ष वयोगट संघाने उपांत्य फेरीत धडक मारली व 17 वर्ष वयोगटातील संघाने अंतिम सामन्यांमध्ये आश्रम शाळा गेवराईच्या विरोधात अप्रतिम झुंज देत उपविजेते पद पटकावले. या यशाबद्दल तालुकाभरातून धोंडराई शाळेच्या संघाचे कौतुक होत आहे.
     या स्पर्धेसाठी संघाचे प्रशिक्षक श्री. गावडे सर व श्री खरात सर यांनी मेहनत घेतली.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

No comments:

Post a Comment