तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Saturday, 16 September 2017

अवैध धंदे जोरात व राजरोसपणे सुरू

परभणी / प्रतिनिधी
जिल्हयासह शहरातील सर्वच ठिकाणी अवैध जोरात व राजरोसपणे सुरू आल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. पोलीस प्रशासन मात्र यांच्यावर कार्यवाही करण्यास धजावत नाहीत.
मानवत तालुक्यात
मराठा समाजाच्या वतीने अवैध धंद्याच्या विरोधात मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले होते त्यावरून आजघडीला मानवत शहरातील अवैध व्यावसाय सध्यातरी बंद ़असल्याचे दिसून येत आहे. परंतू जिल्हयातील उर्वरीत तालुक्यात मात्र आजही राजरोसपणे पोलीसांच्या नाकावर टिचून अवैध धंदे चालवले जात आहे. परभणी, जिंतूर तालुक्­यांमध्ये काही जणांमार्फत अवैध मटका, जुगार, अवैध झटपट लॉटरी,
गुटखा व्यवसाय जोरात चालू असून या व्यवसायाला स्थानिक पोलिस प्रशासनाचा पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे. मटकेबहाद्दर, इतर दलाल गर्दी व वर्दळीच्या ठिकाणी मटका, जुगार, लॉटरी, गुटखा चालवून तरुणांना आकर्षित करीत आहेत. यावर पोलिसांकडून केवळ कारवाईचा देखावा करण्यात येत आहे. असे सर्व अवैध धंदे कायमस्वरूपी थांबविण्यासाठी कोणतीही कारवाई केली जात नाही. परभणी बस स्थानकासमोर वैश्या व्यवसाय सुरु आहेत.परभणी शहरात काळी कमानसमोर, जुना मोंढा परिसर, धार रोड, खंडोबा बाजार, खानापूर फाटा, औद्योगिक परिसर, दर्गा रोड, जिंतूर नाका, पाथरी रोड यासारख्या गर्दीच्या ठिकाणी,मोठ्या प्रमाणात मटका व जुगार अड्डा चालवला जात आहे. शहरात मराठवाडा शाळेच्या बाजुस, सरफराज नगर,एम.आय.डी.सी.परिसर, टाकळी आदी ठिकाणी जुगार अड्डे चालवले जात आहे. परभणी तालुक्­यामध्ये पोखर्णी फाटा, झिरो फाटा, त्रिधारा, झरी, पेडगाव, पिंगळीसारख्या लोकसंख्या जास्त असलेल्या गावांमध्ये, जिंतूर शहरामध्ये शिवाजी बाजार चौक, नगर परिषद व सार्वजनिक वाचनालय परिसर, पशू रुग्णालय परिसर, येलदरी कॉर्नर, जिल्हा परिषद मैदान, शासकीय रुग्णालय परिसर, आडगाव फाटा, आडगाव, भोगाव, चारठाणा, बोरी या गावांमध्ये अवैध व्यवसाय राजरोसपणे चालवले जाते. परंतू पोलासांच्या वतीने थातूर मातूर कार्यवाही करून स्वत:ची पाठ थोपवण्याचे काम केले जात आहे

No comments:

Post a Comment