Breaking News
Loading...

Wednesday, 13 September 2017

फौजदारी कारवाई प्रकरणी महापालिकेचे दोन सफाईसेवक निलंबित

गंभीर दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेतील दोन सफाई सेवकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आदेश दिला.

विजेंद्र लालचंद आठवाल आणि सुरज दिपक बंडवाल अशी निलंबित केलेल्या सफाई सेवकांची नावे आहेत. आठवाल हे 'क' क्षेत्रिय कार्यालयामध्ये व बंडवाल हे 'अ' क्षेत्रिय कार्यालयामध्ये सफाई सेवक म्हणून कार्यरत आहेत.

7 जून 2017 रोजी आठवल व 10 जून रोजी बंडवाल यांच्यावर  गंभीर दुखापत केल्याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती.

आठवाल व बंडवाल यांनी गैरवर्तन करून महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियमाचा भंग केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानुसार, दोघांना अटक केल्याच्या दिनांकापासून सेवानिलंबित करण्यात आले असून खातेनिहाय चौकशी सुरू करण्याचे आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत. आठवाल व बंडवाल यांना निलंबन कालावधीत अटी-शर्तीनुसार निर्वाह भत्ता देण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment