Breaking News
Loading...

Friday, 8 September 2017

वैजापूर तालुक्यातील सुदामवाडी गावानेच एकत्र येऊन दिला आदर्श शिक्षक पुरस्कार.

तेजन्युज हेडलाईन्स वैजापुर तालुका प्रतिनिधी :- सुधीर बागुल

प्रशासकीय पातळीवरती खरोखर मनापासून काम करणाऱ्या शिक्षकांचं गौरव होईल तेव्हा होईल पण वैजापूर तालुक्यातील सुदामवाडी गावाने एक अनोखा कार्यक्रम साजरा केला.शिक्षकदिनाचे औचित्य साधून जि.प.प्रा.शाळा सुदामवाडी चे उपक्रमशील आणि होतकरू शिक्षक मनोज उत्तमराव सोनावणे यांना सर्व गावाने एकत्र येऊन शाल,श्रीफळ आणि प्रमाणपत्र देऊन  “ग्रामस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार” बहाल केला.दुर्गम भागात वसलेल्या या शाळेचा चेहरामोहराच शिक्षक मनोज सोनावणे यांनी गावकरी आणि सहकारी शिक्षकांच्या मदतीने बदलून टाकला आहे.शिक्षण विभागाने मागे राज्यातील सर्व शिक्षकांना सातारा जिल्ह्यातील शाळा पाहयला सांगितल्या होत्या ,परंतु आपल्या शाळांसाठी प्रेरणादायी ठरू शकेल अशी शाळा आपणच तयार का करू शकत नाही या विचाराने त्यांनी काम करायला सुरुवात केली आणि आज हि शाळा जि.प.ची ‘मॉडेल स्कूल’ म्हणून विकसित होत आहे.या कामासाठी त्यांना मुख्याध्यापक आणि सहकारी शिक्षक ,शाळा व्यवस्थापन समिती,ग्रामपंचायत आणि सर्व गावकर्यांनी मोलाचे सहकार्य केले.अत्यंत निसर्गरम्य ठिकाणी वसलेल्या या शाळेत जिल्ह्यातील दुसरया ठिकाणची इंटरएक्टीव डीजीटल क्लासरूम,प्रत्येक वर्गात साउंड सिस्टीम,चोवीस तास वीजपुरवठा,संगणक,प्रिंटर,तसेच सुमारे चार गुंठे जागेत अत्यंत आकर्षक लौन्स आणि बगीचा तयार केला आहे.यासाठी त्यांनी गावकरी आणि शिक्षकांच्या मदतीने पावणेदोन लाखाचा निधी संकलित केला असून अजून अनेक कामे प्रगतीपथावर आहेत.या शाळेने पारंपारिक गणवेशाला फाटा देऊन कॉनवेंट शाळांनाही लाजवेल असा गणवेश ठेवला आहे. विशेष महत्वाची बाब म्हणजे या शाळेत ११ कि.मी.लांब असलेल्या खंडाळा या गावातून १० विध्यर्थी स्वखर्चाने शिक्षणासाठी येतात.सोनावणे यांनी गावातील माजी विध्यार्थी प्रा.बाबासाहेब सोनावणे आणि MIT कॉलेज औरंगाबाद यांच्या सहकार्याने शाळेचीwww.zpprimaryschoolsudamwadi.in हि वेबसाईट देखील बनवली आहे.एकंदरीत भौतिक सोयी सुविधांसह गुणवत्तेच्या बाबतीत आघाडीवर असणारी हि जि.प.ची शाळा आहे.

याप्रसंगी मुख्याध्यापक साईनाथ कवार, संजय जाधव,सुनील सोनवणे,महेश कमोदकर,सुयोग बोऱ्हाडे,रामदास पवार या शिक्षकांचा देखील यथोचित गौरव करण्यात आला. या अनोख्या कार्यक्रमाची संकल्पना शा.व्य.समितीचे अध्यक्ष बाळासाहेब सोनावणे आणि राजेंद्र पवार यांनी प्रत्यक्षात उतरवली.या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव,प्रमोद गुळे सरपंच बेबीताई सोनावणे,उपसरपंच अनिता सोनावणे,तंटामुक्ती अध्यक्ष कांतीलाल जगधने,शा.व्य.समिती उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पवार,माजी सरपंच रमेश जगधने,प्रभाकर सोनावणे,रंगनाथ शेवाळे,राधाकिसन शेवाळे,मा.अध्यक्ष संजय पवार,संजय शेवाळे,पोलीस पाटील मोहन सोनावणे,जनार्धन शेवाळे,नामदेव जगधने,राजेंद्र जगधने, प्रा.बाबासाहेब सोनावणे,उत्तमराव पवार,ज्ञानेश्वर पवार,दाद्साहेब होले,मंदाबाई सोनावणे,मच्छिंद्र पठारे,बापू सोनावणे,दत्तात्रय जगधने,कैलास जगधने सुरेश आहेर आदी बहुसंख्य नागरिक,विध्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते.

गावाने दिलेला हा पुरस्कार राष्ट्रपती पुरस्कारापेक्षाही मोठा असून याबद्दल मी गावकर्यांचे सदैव ऋणी राहील अशी भावना शिक्षक मनोज सोनावणे यांनी व्यक्त केली

No comments:

Post a Comment