तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Friday, 8 September 2017

बुद्धीवाद्यांच्या हत्या थांबवण्यासाठी सरकारने उपाययोजना करावी - संघटनांची मागणी


प्रा. डॉ. संतोष रणखांब
तेजन्युज हेडलाईन्स प्रतिनिधी
सोनपेठ : येथे पुरोगामी संघटनांनी एकत्र येऊन बुद्धीजिवी पत्रकार गौरी लंकेश यांच्या खुनाचा निषेध करून अशा प्रकारच्या हत्या होऊ नयेत यासाठी हल्लेखोरांना अटक करावी या मागणीसाठी निवेदन दिले.
सोनपेठ तालुक्यातील अनेक परिवर्तनवादी संघटनांनी एकत्र येत बुद्धीवादी लोकांच्या हत्या व त्याचा लागत नसलेला तपास या बाबी गंभिर असून पोलिस व तपास यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या आहेत. त्यामुळे हत्या करणाऱ्यांचा तपास लावावा व अशा पद्धतीच्या हत्या होऊ नयेत अशी उपाय योजना करावी. असे निवेदन नायब तहसिलदार एच. यु. मोरे यांना दिले आहे.
यावेळी लाल सेनेचे कॉ. ज्ञानेश्वर मोरे, संभाजी ब्रिगेडचे शिवाजी कदम, शरद भोसले, अ.भा. भटके आदिवासी परिवर्तन दलचे डॉ. दिपक वडकर, स्वाभिमानीचे अमोल गांगर्डे, स्वामुक्टाचे प्रा. डॉ. संतोष रणखांब, मनसेचे मुन्ना (प्रशांत ) बिराजदार, साजेद कुरेशी, बालासाहेब काळे, ज्ञानेश्वर काळे, मिलिंद खंदारे, महादेव भोसले, गणेश चव्हाण, एकनाथ गंगणे, सुनिल दळवे, अनिल भोसले, तुकाराम पवार, साजिद कुरेशी यांच्यासह पत्रकार बांधव उपस्थित होते.

No comments:

Post a Comment