Breaking News
Loading...

Monday, 11 September 2017

ताडकळस येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा करोभार राम भरोसे, वैद्यकीय अधिकारी-याचा मनमानी कारोभार, तर जिल्हा आरोग्य अधिका-याचे दुर्लक्ष


======================
प्रतिनिधि /ताडकळस
धम्मपाल हानवते
=========================

पुर्णा तालुक्यातील ताडकळस हे सर्वात मोठी बाज
ार पेठ आहे. येथे  30 -35 खेड्यापाड्यातील रुग्ण जनता आरोग्य सेवा घेण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात येत असतात, परंतु ताडकळस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डाॅक्टर उपस्थित नसल्यामुळे रुग्णाची हेळसांड होत आहे, ताडकळस येथील आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय असुन सुध्दा परिस्थिति जैसे थे,
शासकीय नियमानुसार एखादा वैद्यकीय आधिकारी शासकीय रुग्णालयात नौकरी करत असल्यास त्या वैद्यकीय आधिका-याला खासगी दवाखाना सुरु करुन व्यवसाय करता येत नाही तरी पण वैद्यकीय आधिकारी डॉ. काचगुंडे यांचा पुर्णा येथे खाजगी दवाखाना असल्यामुळे डॉ. काचगुंडे हे तालुक्याच्या ठिकाणाहून ये जा करतात तर दुसरे वैद्यकीय अधिकारी डॉ. बोरीकर हे नांदेड येथुन ये जा करत असुन काही कर्मचारी देखील तालुका व जिल्ह्यासारख्या ठिकाणाहून Up Down करत असतात,तर येथील उपस्थित कर्मचारी रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय आधिकारी उपस्थित नसल्सास येथील कर्मचारी वैद्यकीय आधिका-याला फोनवर विचारुन कोणती तरी औषधी देत रुग्णांच्या जिवितास खेळत, आसल्याचं व येथे काही प्रकारचे औषधी उपलब्ध नसल्याचं काही गावकऱ्यांनी निवेदनाद्वारे म्हटलं आहे ताडकळस येथे वैद्यकीय आधिका-याला राहण्यासाठी कार्टरची व्यवस्था असुन देखील असं का आसा सवाल गावक-यातुन प्रशासनाला विचारला जातोय ताडकळस येथील रा, काँ, युवा नेते ञ्यंबक आंबोरे, काँग्रेसचे युवा नेते रामप्रसाद आंबोरे, ताडकळस कृषि उत्पन्न बाजार समितिचे माजी. सभापति आर. आर. भोसले, यांच्यासह 30 -40 गावकऱ्यांनी जिल्हा आरोग्य आधिकारी यांना निवेदन दिले आहे. येत्या 16 सप्टेंबर पर्यंत रुग्ण सेवा सुरुळीत होऊन योग्य ती कार्यवाही नाही झाल्यास 17 सप्टेंबर रोजी (मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी) लोकशाही पद्धतीने व शांततेच्या मार्गाने सर्वपक्षीय नेते व गावकऱ्यांच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र ताडकळस येथे तिव्र आंदोलन करण्यात येईल व याची सर्वस्व जवाबदारी ही आरोग्य विभागाची राहील

No comments:

Post a Comment