Breaking News
Loading...

Friday, 15 September 2017

स्पर्धा परिक्षेच्या विशेष वर्गांना सुरूवात


प्रा. डॉ.संतोष रणखांब
तेजन्युज हेडलाईन्स प्रतिनिधी
सोनपेठ : येथील कै.रमेश वरपूडकर महाविद्यालयात 'करियर अॅण्ड कौन्सिलिंग सेल' च्या वतीने दरवर्षी महाविद्यालयात विविध स्पर्धा परिक्षांचे आयोजन, स्पर्धा परिक्षा ऊत्तिर्ण मान्यवरांचे मार्गदर्शन आदी ऊपक्रम राबवले जातात.
   याचाच एक भाग म्हणून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणे सुलभ व्हावे यासाठी मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी व अंकगणित या घटकांच्या विशेष वर्गांचे आयोजन करियर व कौन्सिलिंग सेलकडून करण्यात आल्याची माहिती विभाग प्रमुख प्रा.डाॅ.कल्याण गोलेकर यांनी दिली.
   या विशेष व्याख्यानापैकी "स्पर्धा परिक्षा व मराठी व्याकरण" या विषयावर प्रा. सखाराम यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले. परिसरातील विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या सुप्त क्षमतांचा विकास व्हावा. त्यानी स्पर्धा परिक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जावे. या ऊद्देशाने महाविद्यालयाकडून वेळोवेळा असे प्रयत्न करण्यात येतात. यापुढे ही अंकगणित, चालू घडामोडी, विज्ञानाच्या विशेष वर्गाचे आयोजन केले जाणार असल्याचे डाॅ.गोलेकर के.एम. यांनी कळवले असून याचा सोनपेठ परिसरातील स्पर्धा परिक्षेची तयारी करणा-या विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. या प्रसंगी व्याख्यानाची भूमिका, कार्यक्रमाचे प्रास्ताविक , व्याख्यात्यांचा परिचय व सत्कार करून प्रा.सखाराम कदम यांचा जवळपास दिड तासाचा हा विशेष वर्ग घेण्यात आल्याचे COC विभागाकडून कळविण्यात आले.

No comments:

Post a Comment