Breaking News
Loading...

Tuesday, 12 September 2017

काँग्रेस पक्षाला पाथरीत खिंडार शहराध्यक्ष लालू खान स्वगृही राकाँत परतले

कार्तिक पाटील

पाथरी:-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक लालू खान यांची आज पुन्हा स्वगृही वापसी झाली जिल्हाध्यक्ष आ.बाबाजानी दुर्रांनी माजी नगराध्यक्ष न प गटनेते जुनेदखान दुर्रांनी यांनी त्यांचे स्वागत केले
आ दुर्रांनी यांचे अतिषय विश्वासू म्हणून आेळख असलेले माजी नगरसेवक तथा काँग्रेस पक्षाचे विद्यमान शहराध्यक्ष लालू खाँन यांनी ओळख होती न प निवडणूकी आधीच त्यांनी राकाँला सोड चिठ्ठी देत काँग्रेस पक्षात प्रवेश करून माजी मंत्री वरपुडकर यांच्याशी जवळीक साधली होती वेगळी चूल मांडल्याने आमदार दुर्रांनी यांना हा मोठा धक्का मानला जात होता मात्र न प निवडणूकीत पुन्हा एकदा आपणच पाथरीत सर्वस्व असल्याचे आ दुर्रानी यांनी सिद्ध करून दाखवले होते. लालू खान यांच्या घर वापसीने निश्चितच राकाँची शहरात ताकद वाढणार आहे.काँग्रेस चे राष्ट्रीय उपाध्यक्ष खा राहूल गांधी यांच्या मेळाव्या साठी ही लालू खान गेले नव्हते. मंगळवारी रात्री उशिरा आ बाबाजानी दुर्रांनी यांच्या उपस्थितीत लालू खान यांची घरवापसी झाली. या प्रसंगी दोघांनी जुन्या आठवणींना उजाळा देत आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच आगामी काळात पाथरी शहराच्या विकासा साठी, सर्व प्रश्न एकत्रीत  सोडविण्या साठी  काम करण्याचा ठाम निर्णय घेतला.या वेळी लालू खान यांचे आ दुर्रांनी ,न प गटनेते जुनेद खान दुर्रांनी यांनी त्यांचे स्वागत केले आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी निसार खान उपस्थित होते.

No comments:

Post a Comment