तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Saturday, 9 September 2017

पत्रकार संघ व विविध संघटनांच्या वतीने प्रा. डॉ. रणखांब यांचा सत्कार


तेजन्युज हेडलाईन्स प्रतिनिधी
सोनपेठ : येथिल तेजन्युज हेडलाईन्सचे प्रतिनिधी व कै. रमेश वरपुडकर महाविद्यालयाचे प्राणिशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. संतोष रणखांब यांना रोटरी क्लबच्या वतीने राष्ट्रनिर्माते शिक्षक गुरूगौरव पुरस्कार मिळाल्यामुळे तालुका पत्रकार संघटना व विविध परिवर्तनवादी संघटनाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
नुकतेच सोनपेठ येथिल रोटरी क्लबच्या वतीने राष्ट्रनिर्माते शिक्षक गुरूगौरव 2017 च्या पुरस्काराचे वितरण झाले असून यामध्ये प्रा. डॉ. संतोष रणखांब यांची निवड करण्यात आली आहे. त्याबद्दल त्यांचा पत्रकार संघ सोनपेठ, लालसेना, अ. भा. भटके विमुक्त परिवर्तन दल व इतर संघटनांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष अतुल कोरपे, कार्याध्यक्ष भागवत पोपडे,  उपाध्यक्ष बालाजी भोसले, लालसेनेचे कॉ. ज्ञानेश्वर मोरे, कॉ. चव्हाण, अ.भा. भटके विमुक्त परिवर्तन दलचे डॉ. दिपक वडकर, मिलींद खंदारे, बालासाहेब काळे, ज्ञानेश्वर काळे आदींची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment