तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Friday, 8 September 2017

विद्युत तार तुटल्याने मेंढीचा मृत्यू


प्रा. डॉ.संतोष रणखांब
तेजन्युज हेडलाईन्स प्रतिनिधी
सोनपेठ : तालुक्यातील नरवाडी ग्रा.पं. हद्दितील सर्व परिसरात महावितरणाचे लक्ष नसल्याने तारा लोंबकाळत आहेत. यातुनच आज सकाळी नरवाडी गावालगतच्या तांडा परिसरात नरवाडी येथिल शेतकरी श्री गोविंदराव जोगदंड यांच्या शेतात श्री नारायण धुमाळ यांची मेंढी  महावितरणाची तार पडल्यामुळे मृत्यू पावली.
तारा तुटणे, बैलगाडीस अडकणे असे प्रकार महावितरणाच्या भोंगळ कारभारामुळे होत आहेत. तरी नारायण धुमाळ या शेतकऱ्याला याचा फटका बसला असून आपली मेंढी गमवावी लागली आहे. या अगोदरही गावकऱ्यांनी महावितरणला वेळोवेळी पत्र व्यवहार करुन गाव व परिसरातील लोंबकळत असणाऱ्या तारा व्यवस्थित कराव्यात म्हणुन कळवले होते. पण महावितरणने दखल न घेतल्याने सामान्य शेतकरी धुमाळ यांना एका मेंढीस मुकावे लागले आहे.
या प्रकाराने महावितरण जागे होईल का?  कि अाणखी विनाकारण एखाद्या माणसाचा बळी जाण्याची वाट पाहील ? या अपघाताबद्दल धुमाळ यांना नुकसान महावितरणने नुकसान भरपाई द्यावी. भरपाई नाही मिळाली तर आणि गावातील व परिसरातील लोंबकळणाऱ्या महावितरणाचा तारा जर व्यवस्थित नाही केल्या तर महावितरणाविरोधात आंदोलन छेडण्यात येईल व यापुढे होणाऱ्या परिणामास महावितरण जबाबदार असेल अशी प्रतिक्रिया गोविंद राघोजी जोगदंड ग्रा पं सदस्य नरवाडी यांनी दिली असून तहसिलदारांना निवेदन देणार असल्याचेही सांगितले.

No comments:

Post a Comment