Breaking News
Loading...

Tuesday, 12 September 2017

देवनांद्रा ग्रा पं क्षेत्रातील ज्ञानेश्वर नगरात घाणीचे साम्राज्य

कार्तिक पाटील

★जाणिव पुर्वक दुर्लक्ष करत असल्याची रहिवाशांची भावना
पाथरी:- देवनांद्रा ग्रामपंचायत हद्दीत येत असलेल्या पाथरी शहरा लगत ज्ञानेश्वर नगर भागात अनेक ठिकाणी नाल्या आणि रस्ते नसल्याने घरातील पाणी मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर साचून त्यातून दुर्गंधी येत असल्याने आणि डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने या भागातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून देवनांद्रा ग्रा पं ची आेळख आहे. पाथरी शहराला लागून असलेला ज्ञानेश्वर नगर आणि गुलशन नगर आणि अजून काही भाग या ग्रा पं हद्दीत येतो ज्ञानेश्वर नगर, नरेंद्र नगर आणि ईतर भागात कर्मचारी वर्ग मोठ्या प्रमाणात वास्तव्यास असून नियमित कर भरणा करत असतात त्या मुळे सहाजिकच सर्व सुविधा मिळाव्यात ही अपेक्षा या भागातील नागरीक ठेऊन आहेत मात्र चाकरमानी मंडळी या विषयी पाठपुरावा करू शकत नाही सर दिल्या नंतर तरी नाली, रस्त्याची कामे होतील अशी या मंडळीची अपेक्षा असते मात्र ग्रामपंच्यायत चे सरपंच आणि या भागातून निवडून दिलेले लोकप्रतिनिधी वारंवार या विषयी सांगून ही जाणिव पुर्वक दुर्लक्ष करत असल्याची भावना या भागातील नागरीक व्यक्त करत आहेत. या भागात नाली आणि पक्के रस्ते नसल्याने घरातील पाणी खड्यात साचून राहील्याने मोठी दुर्गंधी पसरत आहे. तर काही पाणी रस्त्यावर साचल्याने पादचारी मंडळीला अडचणीचे ठरत असून याच घाणीत भर पडत आहे ती डूकरांची डूकरे या घाण पाण्यात राहून मोठ्या प्रमाणात घान वाढवण्याचे काम करत आहेत. ज्ञानेश्वर नगरातील तिस-या गल्लीत नाल्यांचा अभाव दिसून येतो या भागात किमान नाल्या तयार व्हाव्या ही अपेक्षा नागरीकांची असून या कडे सरपंच आणि या भागातील निवडून आलेले लोकप्रतिनीधी ग्रा पं सदस्य लक्ष देतील का ? असा प्रश्न या भागातील नागरीक उपस्थित करत आहेत. या बरोबरच तुंबलेल्या नाल्या ही गेली कित्तेक महिण्यां पासून काढण्यात आलेल्या नाहीत त्या मुळे दुर्गंधी वाढत आहे तर रिकाम्या जागेत मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे वाढल्याने डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने आणि साचलेला कचरा ही उचलला जात नसल्याने ठिकठिकाणी कच-याचे ढिग साचून त्यातून दुर्गंधी येत आहे.या भागाला लागून असलेल्या पाथरी शहरात स्वच्छता असतांना हा भाग मात्र वंचित राहातो याला कारण या भागातील जनतेने निवडून दिलेल्या ग्रा पं च्या पदाधिका-यांची उदासिनता असल्याचे मत रहिवाशी उघडपणे व्यक्त करत असून या विषयी आ बाबाजानी दुर्रानी यांच्या कडे तक्रार करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment