तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Tuesday, 12 September 2017

शिक्षक कॉलनी परिसरातील विद्युततार तात्काळ बदलण्यात याव्यात - नगरसेवक अलोक चौधरी

कार्तिक पाटील
पाथरी - शहरातील शिक्षक कॉलनी भागातून जाणाऱ्या विद्युत वाहिनीची ४४०वोल्ट ची तार अचानक कोसळल्याने रस्त्यातुन जाणाऱ्या विद्यार्थी व नागरिकांची  एकच धांदल  उडाली दरम्यान तुटलेलि तार जमिनीत दिड फुट घुसून त्यातून आगीचे लोळ उठत होते सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही .सदरील तार ही सुरक्षा तार न लावल्यामुळे  अतिरिक्त ताण आल्यामुळे तुटली असल्याचे निदर्शनास येत आहे  . दरम्यान घटनेनंतर या भागाचे नगरसेवक आलोक चौधरी यानी माहावितरण अधिकाऱ्यांना या नेहेमीच्या होत असलेल्या प्रकारा बद्द्ल चांगलेच धारेवर धरले.
या बाबत अधिक माहिती अशी कि शहरातउच्चभ्रू वसाहत शिक्षक कॉलनी येथे आज दि १२- ९- २०१७ रोजी सकाळी ९:३० वा जागृत हनुमान मंदिर च्या बाजूस नप रोड वरुन पाथ्री फिडर २ व पाथ्री फीडर ३  या उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या जातात त्याची तार तुटल्या मुळे परिसरात एकच धंदल उडाली शालेय विद्यार्थी व परिसरातील नागरिक जिवाच्या आकांताने सैरा वैरा पळु  लागले  ही घटना इतकी भयावह होती की तुटलेल्या तारेतून आगीचे प्रचंड मोठे लोळ निघत होते  . या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असून या भागात दोन शाळा असल्यामुळे विद्यार्थीसुद्धा मोठ्या संख्येने या रस्त्यावरुन जातात या घटनेमुळे परिसरातील नागरीक ,शालेय विद्यार्थी व त्यांच्या पालकांमध्ये असुरक्षिततेचीभावना निर्माण झाली आहे  यापूर्वीही तार तुटन्याचा प्रकार घडला होता.  दरम्यान सदरील घटने बाबत शिक्षक कॉलनी भागातील नगरसेवक अलोक चौधरी यानी उपकार्यकारी अभियंता यांना लेखी निवेदन देवून तात्काळ नवीन तार बसवून त्या तारेवर सुरक्षा तार लावण्याची मागणी केली आहे .
या निवेदनावर सुनील उन्हाळे ,प्रमोद पोरवाल , लिंबाजी मिर्जे ,वसंत जोशी,गजानन टोके ,अमित उदावंत, संकेत कोल्हे ,सोमनाथ पोटपल्लेवार ,सुमित कोल्हे ,श्रीकांत जोशी ,गजानन गायवाड ,गजानन दिवाण आदी स्वाक्षऱ्या आहेत .

No comments:

Post a Comment