तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Thursday, 14 September 2017

चिमुकल्याला अमानुष मारहाण करणाऱ्या निर्दयी शिक्षिकेला अटक


_________________________

तीन वर्षांच्या चिमुकल्याला अमानुष मारहाण करणाऱ्या कोचिंग क्लासच्या निर्दयी शिक्षिकेला अटक करण्यात आली आहे. भाग्यश्री पिल्ले असं शिकवणी शिक्षिकेचं नाव आहे. सांगवी पोलिसांनी आज ही कारवाई केली. पिंपळे गुरव मध्ये चार दिवसांपूर्वी देव कश्यप या मुलाला शिक्षिकेने अमानुष मारहाण केली होती. लाकडी पट्टीने या मुलाच्या डोक्यात, हातावर आणि पाठीवर मारण्यात आलं. हा मार इतका जोरात होता, ज्यामुळे मुलाचे डोळेही सुजले आहेत. शिक्षिकेकडून मारहाण केल्यामुळे संतप्त नातेवाईकांनी तक्रार देण्यासाठी पोलिस स्टेशन गाठलं. मात्र पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप देवच्या नातेवाईकांनी केला आहे. देवचे सुजलेले डोळे पाहूनच शिक्षिकेने केलेली मारहाण किती अमानुष होती, याची कल्पना येते. तर मुलाला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र कुटुंबीय तिथून निघून गेले, असा दावा पोलिसांनी केला आहे.अखेर काल रात्री पोलिसांनी शिक्षिके विरोधात बाल संरक्षक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आणि आज तिला अटक केली.

No comments:

Post a Comment