तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Thursday, 7 September 2017

ब्रह्माकुमारीज विद्यालयाने शिक्षक दिनी केला १६० शिक्षकांचा सत्कार

सन्मानित शिक्षक गौरवाने गहिवरले संचालिका ज्योती दिदींच्या नियोजनाची झाली प्रसंशा

      रिसोड:- महेन्द्र महाजन जैन
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय रिसोड च्या वतीने शिक्षक दिनाच्या निमित्त आयोजित शिक्षक सन्मान समारंभात तब्बल १६० शिक्षाकांना सन्मानित करण्यात आले. नयनदीप्य व सुनियोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी    ब्रह्मा कुमारीज सेवा केंद्र अकोला वाशिम च्या प्रभारी  राजयोगिनी ब्रह्माकुमारी रुख्मिनी दीदी तर प्रमुख उपस्थिती राजयोगिनी ब्रह्माकुमारी ज्योती दीदी संचालिका ईश्वरीय विद्यालय रिसोड,मा. बाबरावजी खडसे पाटील अध्यक्ष जीवन विकास संस्था रिसोड,सुधाकर पानझाडे मुख्याधिकारी न. प रिसोड, डॉ विजयराव तुरूकमाने प्राचार्य बाबासाहेब धाबेकर महाविद्यालय रिसोड इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
सर्वप्रथम दीप्रज्वलन करून   परमशिक्षक परमपीता परमेश्वराचे स्मरण करण्यात   आले.विद्यालयाच्या वतीने संचालिका ब्रह्माकुमारी ज्योती दीदींनी मान्यवरांचे शाल श्रीफळ व प्रतिमा भेट देऊन  स्वागत केले.
राजयोगिनी ब्रह्माकुमारी रुख्मिनी दीदींनी शिक्षकांना मार्गदर्शन करताना त्यांच्या ज्ञानदानाच्या पवित्र कार्याची प्रशंसा केली आपली पुसट होत असलेली आत्मिक ओळख  जाणून घेण्यासाठी ईश्वरीय विद्यालयातून दिल्या जाणाऱ्या ज्ञानाचा अनुभव करून घ्यावा वआपल्या दैनंदिन जीवनात सकारात्मक विचारांना प्राथमिकता देऊन मानसिक व बौद्धिकदृष्ट्या सक्षम होऊन विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करून त्यांना विकारांपासून दूर राहण्यासाठी आवश्यक अध्यात्मिक ज्ञानाचा आधार घ्यावा दैवी गुण धारण करून विद्यार्थ्यांचे चारित्रवान जीवन घडविण्याचे कार्य करणारे आपण शिक्षक आहात असे मार्गदर्शन केले. अपल्या प्रास्ताविक भाषणात ज्योती दीदींनी शिक्षक दिनाच्या निमित्ताने शिक्षकांचा सन्मान करण्याचे कार्य ही ईश्वरीय सेवाच असून ज्ञानाच्या माध्यमातून माणसाला देवता समान बनविता येणं शक्य असून ब्रह्माकुमारीज विद्यालय ईश्वरीय ज्ञान देण्याचं कार्य रिसोड शहरात मागील वीस वर्षापासून सातत्याने करीत आहे ईश्वर हा परम शिक्षक असून आपण त्यांचेच कार्य करीत असल्यामुळे शिक्षकांचा सन्मान सतत होत राहावा व तसे सन्मानजनक कार्य शिक्षकांनी करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रमुख अतिथी बाबारावजी खडसे यांनी विद्यालयाच्या या सत्कार समारंभात तब्बल १६०शिक्षाकांचा सत्कार करण्याचा विचार व नियोजन याची प्रसंशा केली  शिक्षण व्यवस्था बदलत असताना शिक्षकांनी सुदधा बदल स्वीकारला. शिक्षणात   नैतिकतेचे अधिष्ठान अतिशय महत्वाचे असून असा अध्यात्मिक केंद्राकडून होणारा सन्मान नैतिकता अधिक घट्ट करून ज्ञानदान अधिक प्रभावीपणे करण्यासाठी शिक्षकांचे मनोबल उंचावण्यासाठी उपयुक्त ठरतो. प्राचार्य विजयराव तुरूकमाने यांनी बोलताना योग व ज्ञान ही माणसाच्या जीवनात सकारात्मक बदल घडविणारे घटक असून या दोहोंला ब्रह्मा कुमारीज विद्यालयात अनन्य महत्व आहे मानसिक स्थिरतेसाठी   सर्वांनी राजयोग शिबीर करण्याचा सल्ला त्यांनी दिला.मुख्याधिकारी पानझाडे यांनी शिक्षक हा आदर्श समाज घडविणारा निर्माता असून विश्व परिवर्तन करण्याची क्षमता ज्ञान कार्यातआहे.समस्यांशी सामना करण्याची मानसिक सुदृढता केवळ अध्यात्मिक ज्ञानात आहे प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विद्यालय सतत सामाजिक उपक्रम राबवून ईश्वरीय सेवेचे व्रत पूर्ण करतात सर्वांनी किमान एक वृक्ष लावण्याचा सल्ला पानझाडे यांनी दिला.१६०शिक्षकांचा एकाच ठिकाणी सत्कार होणे ही अतिशय गौरवास्पद बाब असून सर्व शिक्षकांना विद्यालयाच्या वतीने सन्मान पत्र, तणावमुक्त जीवन ही पुस्तिका, गुलाब पुष्प देऊन    राजयोगिनी ब्रह्माकुमारी रुख्मिनी दीदी व मान्यवरांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला. सन्मानित झालेले शिक्षकांनी अतिशय हर्षितमुखाने सत्कार स्वीकारला या भव्य कार्यक्रमात झालेल्या गौरवाने शिक्षक,शिक्षिका गहिवरून गेले व विद्यालयाला धन्यवाद दिले. संचालिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी ज्योती दीदी व सहसंचालिका वंदना दीदी यांच्या नियोजन,व्यवस्थापन व सेवेची सर्व मान्यवर व सत्कारमूर्तींनी प्रसंशा केली. कु.ऋजुता अंभोरे  केलेले स्वागत नृत्य कार्यक्रमाचे आकर्षण ठरले. सत्कारमूर्तीच्या वतीने प्रातिनिधिक मनोगत मुख्याध्यापक राजेंद्र घोंगे व सौ सरस्वती ढेकळे यांनी व्यक्त केले व एवढ्या मोठ्या संख्येने शिक्षकांचा यथोचित सत्कार केला व गौरव सोहळ्यात साक्षीदार होण्याची संधी दिल्याबद्दल विद्यालयाचे आभार मानले. कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन रवि अंभोरे यांनी केले तर सर्वांचे
आभार विद्यालयाच्या सहसंचालिका ब्रह्माकुमारी वंदना दीदींनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता विद्यालयाचा शिक्षण प्रभाग च्या प्रमुख ब्रह्माकुमारी वर्षादिदींच्या मार्गदर्शनाखाली सदस्य अर्जुन खिराडे, भागवत घुगे, भगवान काळे, सरोळकर भाई,गाताडे भाई,प्रा.शरद टेमधरे,प्रशांत मोरे, प्रा विजय डाखोरे,अपर्णा कुबे, अंजली येलेकर,पूजा डाखोरे, गजानन आरु,केशव इंगळे, अशोक निचळ,नागप्पा चवरे, मेहता भाई,भगवान देवकर,धीरज भाई इत्यादींनी सत्कार समारंभ यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.सत्कार मूर्तीमध्ये तालुक्यातील प्रार्थमीक शाळेपासून तर महाविद्यालयापर्यंत ज्ञानदान करणारे शिक्षक- शिक्षिका उपस्थित होते. या  कर्यक्रमाला अकील घनकर,चाफेश्वर गांगवे, श्याम पल्लोड, संदीप पवार, प्रा प्रवीण हाडे यांनी विशेष सहकार्य केले.

महेन्द्र महाजन जैन रिसोड
9960292121

No comments:

Post a Comment