तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Thursday, 7 September 2017

अतिक्रमणितांच्या पिटिआरसाठी आ. अमरसिंह पंडित यांचे प्रयत्न

सुभाष मुळे ...
-------------------
गेवराई, दि. ०७ __ शहरातील संजयनगरसह इतर अतिक्रमणीत भागातील रहिवाशांना हक्काचा पिटीआर मिळावा म्हणुन आ. अमरसिंह पंडित यांनी विधीमंडळात सतत आवाज उठविला आहे. सभागृहातील आश्‍वासनानुसार गुरुवार दि. ७ सप्टेंबर रोजी विधान भवनात उच्चस्तरिय समितीची बैठक झाली. आचारसंहिता संपल्यानंतर पुन्हा एकदा मंत्र्याच्या उपस्थित बैठक आयोजित करण्याचे आदेश सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिले आहे
          गेवराई शहरातील संजयनगर, साठेनगर, संतोषनगर, अचानकनगर, इस्लामपूरा आदी भागात राहणार्‍या दोन हजाराहुन अधिक रहिवाशांना हक्काचा पिटीआर मिळावा म्हणुन आ. अमरसिंह पंडित यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी विधीमंडळात या प्रश्‍नाला वाचा फोडल्यानंतर आ. अमरसिंह पंडित यांच्या पुढाकारातुन गुरुवार दि. ७ सप्टेंबर रोजी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीला आ. अमरसिंह पंडित यांच्यासह राज्याच्या महसुल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, उपविभागी अधिकारी विठ्ठल उदमले, नगर पालिकेचे मुख्याधिकारी बिघोत, नगर रचनाकार भोसले, नायब तहसिलदार जोशी यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.
      बैठकीत आ. अमरसिंह पंडित यांनी अधिकार्‍यांना चांगलेच फैलावर घेतले, नगर पालीकेने सन १९९५ पुर्वीचे रहिवाशी असल्याचे पुरावे देतांना राजकीय दबावापोटी विशिष्ट पक्षाच्या लोकांना हे पुरावे दिल्याचे हरकत त्यांनी घेतली. सर्व्हे नं. १२५ मधील अतिक्रमणाबाबत मुख्याधिकार्‍यांना माहिती देता आली नाही, शहरातील गायरान जमिनी बाबत सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी हरकत घेतली, सभापतींनी या बाबत तातडीने कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या. प्रकरणात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली उप विभागीय अधिकारी आणि मुख्याधिकारी यांची समिती नेमण्याची मागणी आ. पंडित यांनी केली. आजवर हे प्रकरण प्रलंबित राहण्याची कारणमिमांसा करतांना नगर पालिकेचा हलगर्जीपणा बैठकीत समोर आला. बीड जिल्ह्यात ग्रामपंचायतीची अचारसंहिता लागु असल्यामुळे मंत्री या बैठकीला उपस्थित राहु शकले नाहीत तर प्रधान सचिव (महसुल) यांनी अचारसंहितेमुळे केवळ या विषयी आढावा घ्यावा, निर्णय घेता येणार नाहीत अशी विनंती केली. त्यामुळे अतिक्रमणधारकांच्या प्रश्‍नांबाबत कोणताही निर्णय झाला नाही. आचारसंहिता संपल्यानंतर पुन्हा एकदा मंत्र्याच्या उपस्थित बैठक आयोजित करण्याचे आदेश सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिले आहेत.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

No comments:

Post a Comment