Breaking News
Loading...

Monday, 11 September 2017

आमदार प्रशांतजी बंब याच्या अथक प्रेत्नाणी

गंगापुर  प्रतिनिधी  संपत रोडगे
गंगापूर सहकारी साखर कारखाना सुरु होणार आसल्याने तालुक्यातील जनतेत उत्साह  निर्माण झाला असून मृंत अवस्थेतील कारखाना वैभवशील करण्यासाठी आ. प्रशांत बंब प्रेत्नशिल आहेत .

बंद पडलेला कारखाना पुढील वर्षात सुरु होणार असल्याची चर्चा तालुक्यात सुरु आहे. गंगापूर कारखाना २००८ मध्ये बंद पडला व कर्जाचा डोंगर वाढतच गेल्याने सहकार बँकेने कर्ज वसुलीसाठी कारखाना ताब्यात घेऊन तो राजाराम फूडस् प्रा.लि. यांना २९ कोटी १ लाख रूपयांत विक्री केला होता. तेव्हापासून कारखाना बँकेच्या ताब्यात होता कारखाना बंद पडल्याने कामगाव, शेतकरी देशोधडीला लागले. हक्काचा कारखाना बंद पडल्यामुळे उस उत्पादक शेतकऱ्यांना आपला उस इतर करखान्याला कवडीमोल दरात विकावा लागला. होता .ही बाब आमदार बंब यांच्या लक्षात आल्याने आमदार प्रशांतजी बंब यांनी विक्रीला विरोध करत न्यायालयीन लढा उभारला होता.
कारखाना शेतकर्‍यांच्या मालकीचा राहवा म्हणुन  गेल्या काहि वर्षापासुन न्यायालयीन प्रकरण सुरु आसल्या कारनानी न्यायालयीन निकालाला आधीन राहुन मुख्यमंत्री देवेद्र फडनवीस व सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी शेतकर्‍यांचे हित पाहता विषेश  आधिकार वापरून  राज्य सहकारी  बँक यांना आदेश देऊन कारखाण्याची जप्त केलेली सार्व मालमत्ता आहे त्या स्थीतीथ संचालक मंडळाच्या ताब्यात देन्याचे आदेश देण्यात आले आहेत त्यानुसार आज सोमवारी दि २४ जुलै रोजी रोजी बँकेचे अधिकारी बाळासाहेब देशमुख यांनी रघुनाथनगर येथील  कारखाना साईट मध्ये येऊन कारखाण्याच्या रीतसर  ताब्यात देने बाबद पत्र व कारखाण्याच्या च्याव्या कारखाण्याचे चेअरमन तथा आमदार प्रशांत बंब व संचालक मंडळाकडे दिल्या यावेळी 
कारखाना. स्थळावर उसतोड मजूर, कर्मचारी यांच्यावर चालणारा विविध प्रकारचा व्यवसाय देखील बंद पडल्याने व्यापारी देखील स्थलांतरित झाले. 
कारखान्याला वाली राहिला नव्हता मात्र आमदार तथा चेअरमन  प्रशांत बंब यांनी कारखाना सुरु करण्यासाठी वेगाने हालचाली सुरु केल्या असुन दिनांक ९ रोजी कारखाण्याची सर्वसाधारण सभा मध्ये गंगापूर सहकारी साखर कारखान्याची नव्याने उभारणी करून सुरू करण्याचा निर्णय शनिवारी झालेल्या सभासदांच्या सभेत घेण्यात आला. शेती महामंडळाची जमीन कराराने घेण्याचाही प्रस्ताव या सभेपुढे मांडण्यात आला. आमदार तथा कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत बंब यांच्या उपस्थितीत ही सभा पार पडली.
गंगापूर सहकारी साखर कारखाना बँकेकडून संचालक मंडळाच्या ताब्यात आल्यानंतर कारखाना सुरू करण्याच्या हालचालीला वेग आला आहेत

ह्या सर्व वेगाने होणाऱ्या हालचाली पाहता तालुक्यातील नागरीकाच्या आशा पल्लवीत झाल्या आसुन कारखाना सुरु होनार असल्याने उत्साहचे वातावरण जांमगाव परीसरासह गंगापुर तालुक्यात निर्माण झाले आहेत.यामुळे नागरीकामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे
                           9420486389

No comments:

Post a Comment