तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Thursday, 14 September 2017

साहित्यामुळेच माणसाचे व्यक्तिमत्त्व घडत असते - कवि.निलेश चव्हाणसुभाष मुळे...
------------------
गेवराई, दि.13 __ "साहित्य हे व्यक्तीला आणि समाजाला घडवत असतं. भलेही ते काल्पनिक किंवा चिंतनातून अभिव्यक्त होत असेल, मात्र साहित्याचा मुख्य गाभा हा मानवी जीवन आहे. महान अशा साहित्यिकांच्या लेखनातून समाजाला दिशा मिळाली आहे. लेखनातून आणि वाचनातून माणसाचे खरे व्यक्तिमत्त्व घडत असते" असे प्रतिपादन सुप्रसिद्ध युवा कवी तथा वक्ते निलेश चव्हाण यांनी केले.
      मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित र.भ.अट्टल कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, गेवराई येथे" भाषा आणि वाङ्मय मंडळ" उद्घाटन प्रसंगी निलेश चव्हाण हे बोलत होते. प्राचार्य डॉ. रजनी शिखरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला महाविद्यालयातील तिन्ही भाषांचे विद्यार्थी, प्राध्यापक उपस्थित होते. 'भाषा आणि वाङ्मय मंडळ कार्यकारिणी' मध्ये अध्यक्ष कु. दीक्षा सावंत, सचिव कु. नम्रता निपाणीकर, सहसचिव कु. दुर्गा बोर्डे यांची निवड करण्यात आली तर सदस्य म्हणून सौरभ कुलकर्णी, कु. जयश्री माने, कु. मंगल ढोकळे, कु. स्वाती कापसे, कु. गीता बागडे, कु. गीता ढोकळे, धनंजय काळे व ओंकार फड यांचे निवडीबद्दल यावेळी अभिनंदन करण्यात आले. मराठी, हिंदी व इंग्रजी विषयाच्या विद्यार्थ्यांना विविध विषयांवर तयार केलेल्या भित्तीपत्रकांचे याप्रसंगी पाहुण्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी 'भाषा व वाङ्मय मंडळ' संयोजक तथा मराठी विभाग प्रमुख डॉ. संदीप बनसोडे यांनी प्रास्ताविकात वर्षभरातील कार्यक्रमांविषयी माहिती देऊन भूमिका मांडली. उपप्राचार्य प्रा. विजय सांगळे, इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. विजयकुमार बांदल, प्रा. संतोष नागरे, डॉ. प्रशांत पांगरीकर ,प्रा.उदय खरात यांची व्यासपीठावर उपस्थित होती. डॉ. समाधान इंगळे पाहुण्यांचा परिचय करून दिला, तर प्रा. शरद सदाफुले यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.कठाळे यांनी आभार मानले.
     याप्रसंगी विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

No comments:

Post a Comment