तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Thursday, 14 September 2017

म्हाडा लॉटरी: पगार दीड लाख, तरीही आमदारांना अल्प गटात राखीव घरं.


_________________________

म्हाडाने आपल्या 819 घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. 16 सप्टेंबर पासून या घरांसाठी ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत. तर 10 नोव्हेंबरला लॉटरी जाहीर होईल. विविध गटांसाठी म्हाडाने घरं राखीव ठेवली आहेत. त्यामध्ये विविध जाती, स्वातंत्र्य सैनिक, पत्रकार, माजी सैनिक, अंध-अपंग अशा विविध कॅटेगरी आहेत. यामध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेतं ते म्हणजे आजी-माजी आमदार-खासदारांसाठी राखीव घरं. म्हाडाच्या सर्वसामान्यांच्या आणि आरक्षित घरांच्या यादीत, तगडा भत्ता,मोठं उत्पन्न असलेले आमदार-खासदार आहेत. महत्त्वाचं म्हणजे अल्प उत्पन्न गटाची मर्यादा 25 हजार ते  50 हजार रुपयांची असूनही, या गटात आमदारांसाठी 4 राखीव घरं ठेवण्यात आली आहेत. एकीकडे आमदारांचे पगार हे गेल्या वर्षीचसचिवांइतके म्हणजेच सुमारे दीड लाख रुपये करण्यात आले आहेत. त्यामुळे म्हाडाने निदान सरकारच्या त्या विधेयकाकडे पाहून तरी, आमदार-खासदारांना अल्प उत्पन्न गटात राखीवघरं ठेवायला नको होती. पण म्हाडाने सरकारच्या विधेयकाकडे कानाडोळा केल्याचं दिसून येतंय. एकीकडे मुंबईत लोकांना राहायला घरं नाहीत. अनेक लोक रस्त्यावर, फूटपाथवर किंवा झोपड्यांमध्ये गुजराण करतात. मात्र आमदारांना वेतन,भत्ता, रेल्वे,एसटी, रुग्णालयात सूट असते. शिवाय आमदारांसाठी मुंबईत सुसज्ज आमदार निवास, मंत्र्यांना बंगले, आमदारांच्या अनेक सोसायटी आहेत, मात्र तरीही त्यांना म्हाडाने घरं आरक्षीत केली आहेत.

No comments:

Post a Comment