तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Tuesday, 12 September 2017

नाशिकमध्ये मनोरुग्णाचा हल्ला, कुऱ्हाडीने वार करुन तिघांना संपवलं.

_________________________

मानसिक रुग्णाच्या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नाशिक मध्ये घडली आहे. नांदगाव तालुक्यातील हिंगण देहरे गावात मानसिक रुग्ण असलेल्या व्यक्तीने आज सकाळी नऊ ते साडेनऊच्या सुमारास लोकांवर कुऱ्हाडीने वार केले. या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाला तर 5 ते 6 जण जखमी आहेत.जखमींना नांदगाव इथल्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून मानसिक रुग्णाला ताब्यात घेण्यात आलं आहे. तो खरंच मनोरुग्ण आहे की नाही याचा पोलिस तपास करत आहेत. या गावात यापूर्वीही अशी घटना झाल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. परंतु आजच्या प्रकारामुळे हिंगण देहरे गावात दहशत पसरली आहे.

No comments:

Post a Comment