तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Thursday, 14 September 2017

परतूरचे भारनियमन तात्काळ बंद करण्याची मागणी


महावितरणचे अभियंता यांना निवेदन

परतूर:- शहरात महावितरणच्या वतीने परतूर येथे सुरू करण्यात आलेल्या लोडशेडिंगच्या विरोधात परतूर येथील विज ग्राहकांनी कार्यकारी अभियंता व्ही. एस.लहाने यांना निवेदन सादर करून भारनियमन त्वरीत बंद करण्याची मागणी करण्यात आली  दिलेल्या निवेदनात उल्लेख करण्यात आले आहे की परतूर शहरात मागील काही दिवसा पासून 09 तासाची लोड शेडींग करण्यात येत आहे जे वीज ग्राहक नियमितपणे वीज बील भरीत असतात त्यांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे जे की अन्याय कारक आहे.
ज्या ग्राहकांच्या कडे वीजबील थकबाकी असेल अशांचे वीज कनेक्शन बंद करण्यात यावा, व नियमित वीज बील भरणा करणार्‍या ग्राहकांची भार नियमनातून सुटका करण्यात यावी,  निवेदनाच्या प्रती माहितीस्तव पालकमंत्री जालना उप कार्यकारी अभियंता व उप विभागीय अधिकारी परतूर यांना देण्यात आले आहे,  निवेदनावर  अखील काजी, नासेर चाऊस; मकसूद कुरेशी, रहिमोदीन कुरेशी, इफ्तेखार काजी, राशेद खां, साबेर शेख, नगर सेवक अय्यूब कुरेशी, कृष्णा अरगडे, सादेक खतीब, प्रकाश चव्हाण, जावेद पठाण, मुबीन शेख, बाबा बागवान, मुख्तार शेख, इत्यादींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

No comments:

Post a Comment