तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Friday, 15 September 2017

जिल्हाधिकारी डोंगरे यांनी घेतली शारदीय नवरात्र महोत्सवाची आढावा बैठक !

            माहूर (प्रतिनिधी) माहूर येथे श्री रेणुकादेवी संस्थान येथील शारदीय नवरात्र महोत्सव २०१७ निमित्य माहूर येथील सर्व शासकीय विभागाची श्रीरेणुकादेवी संस्थान मंदिर प्रशासनासह महत्व पूर्ण आढावा बैठक जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा श्री रेणुकादेवी संस्थानचे पदसिद्ध अध्यक्ष  सुधीर कुलकर्णी, जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, सहाय्यक जिल्हा पोलीस अधीक्षक नांदेडकर, जिल्हा आरोग्य अधिकारी व्ही आर.मेकाले, रापम विभाग नियंत्रक,  सहाय्यक उपवन संरक्षक अरविंद नाले, उपविभागीय अधिकारी तथा श्री रेणुकादेवी संस्थानचे पदसिद्ध सचिव नरेंद्र देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी तथा श्री रेणुकादेवी संस्थानचे पदसिद्ध उपाध्यक्ष  आसाराम जहारवाल, माहूरचे तहसीलदार तथा श्री रेणुकादेवी संस्थानचे पदसिद्ध कोषाध्यक्ष सिद्धेश्वर वरणगावकर,विद्युत वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत गोपूलवाड, दत्तशिखर संस्थान तर्फे नायब तहसीलदार अनिल तामसकर,ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. व्ही.एन भोसले, माहूर नगर पंचायतचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेतली. या बैठकीत सर्व प्रथम प्रत्येक विभागा मार्फत यात्रा नियोजना साठी केलेल्या नियोजनाची माहिती घेतली. राज्य परिवहन मंडळ तर्फे  नवरात्र उत्सव काळात ८० बस ठेवण्यात येणार आहेत. तर आरोग्य विभाग तर्फे देवदेवेश्वर ,टीपॉइंट रेणुकामाता मंदिर पायथ्याशी  व गडावर, दत्तशिखर , अनुसयामाता मंदिर असे एकूण सहा ठिकाणी आरोग्य पथक तैनात केले असून १२ वैद्यकीय अधिकारी, ३ रुग्णवाहिका, १०८ रुग्णवाहिका प्रत्येकी २ एएनएम कर्मचारी तैनात करण्यात येणार असून ते २४ तास तीन पाळीत काम करणार आहेत. विद्युत वितरण कंपनी तर्फे लोंबकळलेल्या विद्युत तारा दुरुस्त करून विद्युत यंत्रणा सुरळीत ठेवण्यासाठी सर्व खबरदारी घेण्यात आली आहे. नवरात्र उत्सवा दरम्यान कसल्याही प्रकारे ब्रेक डाऊन करण्यात येऊ नये अशी विनंती संबंधित विभागास करण्यात आली असून १२ कर्मचारी दोन पाळीत तैनात असणार आहेत. सा.बां, विभागातर्फे श्री रेणुकामाता मंदिर, दत्तशिखर, अनुसयामाता मंदिर रस्त्याची संपूर्ण डागडूजी करण्यात आली असून शासकीय विश्राम गृहात अद्यावत व्यवस्था ठेवण्यात येणार आहे तर सर्व विभागाचे उत्सव कर्मचारी स्टाफ यांच्या साठी खास विश्राम कक्ष सज्ज ठेवण्यात येणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी आरोग्य विभागास श्री रेणुकामाता मंदिराच्या पायथ्याशी एक आरोग्य पथक स्थापन करण्यची सूचना केली. सर्व शासकीय विभागातील अधिकाऱ्यांना यात्रा उत्सव काळात दक्ष राहण्याचे आदेश दिले. नवरात्र उत्सवा दरम्यान खाजगी वाहनांना गडावर जाण्यास प्रतिवर्षीप्रमाणे प्रतिबंध करण्यात आला असून भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून वाहन तळापासूनच रापमच्या बसेस ची व्यवस्था करण्यात आली आहे.

           यावेळी प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश तथा श्री रेणुकादेवी संस्थानचे पदसिद्ध अध्यक्ष सुधीर कुलकर्णी यांनी यात्रा सुरळीतपणे पार पाडण्यास सहकार्य करण्याचे आवाहन करून भाविकांची यात्रा सुखकर करण्यासाठी श्री रेणुकादेवी संस्थान विश्वस्त समिती सज्ज असल्याचे सांगितले.

                  पोलीस विभाग तर्फे  १७ पोलीस अधिकारी व २०० पोलीस कर्मचारी तैनात करणार असून आवश्यकतेनुसार अतिरिक्त पोलीस कर्मचारी तैनात करणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी सांगितले.  श्री रेणुकामाता मुख्य मंदिरात  सफोकेशन होणार नाही याची काळजी घ्यावी ह्याकरिता   दर्शन मंडपात एकावेळी किती जण हजर राहू शकतात व दर्शन मंडपात भाविकांच्या सुरक्षेवर भर देण्याबाबत सूचना देऊन सा.बां. विभागास तसे प्रमाणपत्र देण्याचे सुचविले.यावेळी त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी आसाराम जहारवाल, पोलीस निरीक्षक साळुंके यांनी श्री रेणुकामाता मंदिराच्या परिसराची व दर्शनरांगेची प्रत्यक्ष पाहणी केली. पत्रकार जयकुमार अडकीने यांनी ललित पंचमीनिमित्य संगीत रजनी महोत्सवात सामान्य भाविक कलावंतांना पण संगीत सेवा अर्पण करण्याची संधी देण्यात यावी अशी विनंती केली. तर जितु चोले यांनी रापमच्या प्रत्येक यात्रेतील गलथान कारभाराचा पाढा वाचून या नवरात्र महोत्सवात रापम तर्फे योग्य नियोजन करण्याची अपेक्षा व्यक्त केली.   

               यावेळी माहूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिमन्यू साळुंके,माहूर पं.स. चे गटविकास यु.डी.मांदाडे, संस्थानचे विश्वस्त भवानीदास भोपी. चंद्रकांत भोपी, श्रीपाद भोपी, समीर भोपी, संजय काण्णव, सुरक्षा अधिकारी प्रकाश सरोदे,व्यवस्थापक साबळे,  सा.बां विभागाचे उप कार्यकारी अभियंता बेंबरे, उमाळे, विद्युत वितरण कंपनी चे के.एस. मेश्राम, वनपरिक्षेत्र अधिकारी जाधवआरोग्य विभागातर्फे तालुका आरोग्य अधिकारी मात्र अनुपस्थित होते त्यांचे प्रतिनिधी म्हणून डॉ. वटटमवार , बि.एन.ओ. श्रीमती कविता येवतीकर, तालुका कृषी अधिकारी यांचे प्रतिनिधी पांचाळ, नगरसेवक इलियास बावानी, रेणुकामाता व्यापारी  संघटनेचे अध्यक्ष दिगंबर घोगरे, विनोद भारती, गोविंद आराध्ये, राज ठाकूर,अविनाश टनमने, गजानन भारती, बालाजी कोंडे, राजू दराडे, राम दातीर, मजहर शेख, संजय सुरोशे,  राजकिरण देशमुख, शिवशंकर थोटे, आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment