Breaking News
Loading...

Monday, 11 September 2017

गौरी लंकेश हत्येचा परतूर पत्रकार संघाकडून निषेध.  पत्रकारांचा आवाज दाबण्याचा पर्यत्न केला जात आहे-एम एल कुरेशी.


परतूर:
परतूर पत्रकार संघाच्या वतीने  पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला, यावेळी उपविभागीय अधिकारी परतूर, यांच्याकडे निषेधाचे निवेदन  सादर करून मागणी करण्यात आली की शासनाने निर्भीड पत्रकार गौरी लंकेश यांच्या मारे करर्‍यांचा तपास लावून त्यांना कडक शासन करावे,गौरी लंकेश या लेखिकेची त्याच्या घरा समोर समाज कंटकांनी गोळया घालून हत्या केली गोळ्या घालून हत्या केल्याने विचार मरणार नाहित, हा तर पत्रकारेतेची मुसकटदाबी करण्याचा प्रयत्न असून, यामुळे लोकशाही संपुष्टात आणण्याचा पर्यत्न केला जात आहे.  म्हणून गौरी लंकेशच्या हत्यार्‍यांना त्वरीत अटक करून शासन करावे, व पत्रकारांना सौरक्षण देण्यात यावे  अशी मागणी निवेदनात करण्यात आली निवेदनाच्या प्रति माहितीस्तव  ग्रहमंत्री. भारत सरकार, दिल्ली. ग्रह मंत्री महाराष्ट्र शासन मुंबई. तथा उप विभागीय पोलीस अधिकारी परतूर इत्यादींना देण्यात आले.या वेळी गौरीलंकेश यांच्या हत्याचा निषेध करून श्रद्धांजली वाहण्यात आली.  पत्रकार एम एल कुरेशी यावेळी म्हणाले पत्रकार लोकशाहीचा चौथा स्तंभ असून  पत्रकारांची हत्या केल्याने पत्रकारांचा आवाज दाबण्याचा समाज कंटक प्रयत्न करीत आहे गोळया घातल्याने विचार मरणार नाहीत हे समाज कंटकांनी लक्षात ठेवावे. निवेदनावर परतूर शहरातील सर्व पत्रकारांच्या स्वाक्षर्‍या करण्यात आल्या आहेत.या वेळी पत्रकार संघाचे तालूका अध्यक्ष शामसुंदर चित्तोळा, सचिव भारत सवने, अर्जून पाडेवार, सु.द. शिवणगिरीकर, एम एल कुरेशी, राजू भारूका, शेख अथर, कैलास सोळंके, सरफराज नाईकवाडी, मुशताक देशमुख,अजय कांबळे, लक्ष्मीकांत राऊत, सय्यद वाजेद, खरात,केदार शर्मा, योगेश बरीदे, ढोबडेसर, रामप्रसाद नवल, जावेद पठाण, वायाळसर, संताराम आखाडे, शाम सोनी, आसेफ,रईस अन्सारी,शिवा भारूका अजय देसाई लिंबाळकर,मोईनोदीन शेख, इत्यादी पत्रकार उपस्थित होते.

No comments:

Post a Comment