तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Saturday, 16 September 2017

स्वच्छता हिच सेवा या योजनेचा जिल्हाधिकार्यांचा हस्ते माहुर येथुन शुभारंभ!


उघड्यावर घेतली स्वच्छतेची सभा!
_________________________
माहूर/प्रतिनिधी
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील स्वच्छ भारताची संकल्पना साकारण्यासाठी
सरकार ने दिनांक 15 सप्टेंबर ते 2 अक्टोंबर  पर्यंत ‘स्वच्छता हीच सेवा’ हि मोहिम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.या मोहिमचे शुभारंभ जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते 15 सप्टेंबर रोजी माहुर येथे करण्यात आला.यावेळी उघड्यावर सभा घेऊन जिल्हाधिकार्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज,राष्ट्रपिता महात्मा गांधी,यांच्या स्वप्नातील गाव सार्थक करण्याचे अहवान केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष फिरोज दोसाणी,तर अतिरिक्त जिल्हाधिकारी संतोष पाटील,तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर,उपविभागीय पोलिस अधिकारी असाराम जवाहार,मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोड यांची प्रमुख उपस्थिती होती.

केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानच्या धर्तीवर राज्यामध्ये स्वच्छ महाराष्ट्र अभियान शासन निर्णयाव्दारे राबविण्यात येत आहे.15 सप्टेंबर 2017 ते 2 ऑक्टोबर 2017 या कालावधीत ग्रामपंचायत व नगरपालिका क्षेत्रात स्वच्छता हीच सेवा हा विषय घेवून  राबविण्यात येत असलेल्या या मोहिमेत घर, परिसर,गाव,तालुका,जिल्हा, राज्य स्वच्छ झाले,तर देशही स्वच्छ होईल.त्यामुळे प्रत्येक नागरिकाने स्वच्छता हीच सेवा आहे,असा संकल्प करावा,असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले.तर नगराध्यक्ष फिरोज दोसाणी यांनी माहुर शहराचा जलयुक्त शिवार योजनेत समाविष्ट करावा,शौष खड्ड्यासाठी जिप च्या धर्तीवर तिर्थक्षेत्र माहुर ला सदर ची योजना राबविण्यात यावी अशी विनंती जिल्हाधिकार्या कडे केली.प्रस्ताविकातुन मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोड यांनी नप माहुर ला येणार्या अर्थीक अडचणी विषद करुन ग्राप च्या धर्तीवर माहुर तिर्थक्षेत्र ला विकासा साठी प्रशासकीय मदत मिळावी अशी विनंती केली.या कार्यक्रमात माहूर 100% हंग्गदरी मुक्त करण्यासाठी ज्यांनी दिवस - रात्र मेहनत घेतली असे न.पं चे नगर सेवक ईलीयास बावाणी,नगर सेविका सौ.आश्विनी आनंद तुपदाळे,कु.शितल मेघराज जाधव माहूरचे स्वच्छता दुत आनंद पाटील तुपदाळे,गणेश जाधव यांचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी न.पं चे मुख्यधिकारी काकासाहेब डोईफोडे,लेखापाल वैजनाथ स्वामी,प्रतिक नाईक,उपाध्यक्ष राजकुमारजी भोपी,गटनेते रेहमत अली,नगरसेवक दिपक कांबळे, रफीक सौदागर,नगर सेविका सौ.ज्योतीताई कदम , प्रा.भगवानराव जोगदंड पाटील व सर्व न.पं चे कर्मचारी वृंद हे उपस्थित होते.
संचलन वैजनाथ स्वामी यांनी तर आभार प्रतिक नाईक यांनी मानले.

No comments:

Post a Comment