तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Sunday, 17 September 2017

गेवराई अनाथालयातील बालकांच्या हेगडेवार रूग्णालयाकडून तपासण्या

सुभाष मुळे....
------------------
गेवराई, दि. 17 __ येथील सहारा अनाथालयात (बालग्राम) औरंगाबाद येथील भारत विकास परिषद व डाॅ. हेगडेवार रूग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि.17 रोजी सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य शिबीरात 85 विद्यार्थ्यांच्या विविध प्रकारच्या मोफत तपासण्या करून औषधोपचार करण्यात आले.
    शिबिरात डाॅ. हेगडेवार रूग्णालयाच्या डाॅ. एन.डी. कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या भारत विकास देवगिरी प्रांतच्या डाॅ. पालवे, डाॅ. वैशाली, डाॅ.कशमीरा, मेजर शोभा पाटील, चांडक, टाकळकर, मारू, रमेश मंटू, प्रवीण सातभाई, स्वाती सातभाई यांनी आरोग्य कॅम्प राबविला. बालग्राम, सहारा अनाथालयातील 85 विद्यार्थ्यांना या मोफत आरोग्य शिबीराचा लाभ झाला. विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून लागलीच औषधोपचार ही करण्यात आले. शिबिरात आरोग्य तपासणी करताना विद्यार्थ्यांशी मनमोकळेपणाने सुसंवाद करून आवडी निवडी विचारून त्यांना बोलते केले. शिबिरात डोळे, कान, नाक घसा, पोट या सह सर्वसाधारण तपासण्या करण्यात आल्याची माहिती डाॅ. कुलकर्णी यांनी दिली.
     वंचित घटकांच्या आरोग्य सेवेसाठी भारत विकास परिषदेच्या माध्यमातून हा उपक्रम बांधिलकी म्हणून केला जात असल्याची भुमिकाही डाॅ.कुलकर्णी यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त मांडली. यावेळी बालग्रामचे संचालक संतोष गर्जे, अर्जुन देवकते, बाळू नागरे यांची उपस्थिती होती.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

No comments:

Post a Comment