तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Wednesday, 13 September 2017

'यस सर-यस मॅडम'च्या जागी आता शाळांमध्ये 'जय हिंद' बोलून लागणार हजेरी.

_________________________

मध्य प्रदेशच्या शिवराज सिंग चौहान सरकारने एक नवा वादग्रस्त आदेश जारी केला आहे. शिवराज सरकार मधील शिक्षण मंत्री विजय शाह यांनी हा आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार सतना येथील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आता हजेरीच्या वेळी यस सर-यस मॅडमच्या ऐवजी जय हिंद बोलावं लागणार आहे. जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये एक ऑक्टोबर पासून हा आदेश लागू होणार आहे. सतना जिल्ह्यात हा प्रय़ोग यशस्वी झाला तर शिवराज सिंग चौहान यांच्या परवानगीने राज्यभरात हा आदेश लागू केला जाईल. सतना मधील खासगी शाळांवर हा आदेश लागू करण्यासाठी बळजबरी केली जाणार नाही असं विजय शाह म्हणाले. पण जय हिंदचा संबंध देशभक्ती सोबत असल्याने त्या शाळादेखील हा आदेश लागू करतील अशी अपेक्षा यावेळी विजय शाह यांनी व्यक्त केली. आगामी काळात मध्य प्रदेशमध्ये होणा-या विधानसभा निवडणुकांशी या आदेशाला जोडून पाहिलं जात आहे. मध्य प्रदेशमधील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या कॉंग्रेसकडून मात्र अजूनपर्यंत यावर काही प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही. यापूर्वी वंदे मातरम् वरून देखील वाद झाला होता. शाळांमध्ये ‘वंदे मातरम’ची सक्ती करण्यावरुन हा वाद झाला होता. त्यावेळी ‘वंदे मातरम् म्हणणे हा वैयक्तिक मुद्दा असल्याचे केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी सांगितले होते. ‘ज्यांना वंदे मातरम् म्हणायचे नाही, त्यांना देशद्रोही ठरवता येणार नाही,’ असेदेखील त्यांनी म्हटले होते. महाराष्ट्राच्या विधान सभेतही वंदे मातरम् चा वाद बराच गाजला होता. भाजपाच्या आमदारांच्या ‘वंदे मातरम’च्या सक्तीच्या मागणीला त्यावेळी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी जोरदार विरोध केला होता.

No comments:

Post a Comment